उस्मानाबाद नगरपालिकेच्या गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गणेश खोचरे यांची निवड ...

रिपोर्टर: 

उस्मानाबाद नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांची बैठक दिनांक 28 /12 /20 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 16 नगरसेवकांपैकी 9 नगरसेवक व एक स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. या सर्वानुमते गणेश खोचरे यांना उस्मानाबाद नगरपालिकेच्या गटनेते पदी निवड करण्यात आली.यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,  नगरसेविका फिरोज रुस्तम शेख, रशिदा बाबा शेख , पेठे विठाबाई भीमराव , वंदना अमित शिंदे , अडसूळ राजकन्या पोपट, सरचिटणीस नितीन बागल, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील,शहराध्यक्ष आयाज भाई शेख,कार्यध्यक्ष सचिन भैया तावडे,उपाध्यक्ष मनोज मुदगल, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, नगर सेवक, खलिफा कुरेशी,अमित भैया शिंदे, प्रदीप मुंडे,प्रदीप घोणे, बाबा मुजावर, इस्माईल शेख, अशोक पेठे,प्रदेश उपाध्यक्ष कादर खान, रणवीर इंगळे, अनवर शेख, बिलाल तांबोळी, इस्माईल काझी, मन्नान काझी,इम्रान पठाण चंदन जाधव गणेश देशमुख व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या