मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक






रिपोर्टर: (मराठवाडा ) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे मोठया मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक मारून तिस—या वेळी आमदार होण्याचा मान मिळवला आहे.

औरंगाबाद विभाग (मराठवाडा ) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहीर केले. सतीश  चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली. एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या