स्वेरी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 'ऋणानुबंध २०२०' ऑनलाईन संपन्नरिपोर्टर: पंढरपूरः येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ऋणानुबंध २०२०’ हा आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक लेलँडपुणे चे सहाय्यक व्यवस्थापक सुजित मुंगळे हे उपस्थित होते.

       प्रारंभी स्वेरी अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड अलूमनी अफेअर्सचे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. अविनाश मोटे यांनी मेळावा आयोजित करण्याचा हेतू सांगून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेची यशस्वी वाटचाल सांगितली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व स्वेरीच्या जडण घडणीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान नमूद केले. स्वेरीच्या पहिल्या बॅच (१९९८) पासूनचे अनेक विद्यार्थी जे आज देश विदेशात मोठमोठया पदावर कार्यरत आहेत ते या मेळाव्यात सहभागी झाले होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रा. संदीपराज साळुंखे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अशोक लेलँडचे व्यवस्थापक सुजित मुंगळे यांनी औद्योगिक क्षेत्रातील व खास करून वाहन उद्योगातील बदलत्या प्रवाहांवर प्रकाश टाकला. स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार म्हणाले की, ‘कोविडच्या या कठीण काळातही स्वेरीने आपले शैक्षणिक उपक्रम अतिशय परिणामकारक पणे राबवले. कोविड ला एक संकट न मानता त्याला एक संधी समजून विविध विषयांचे अध्यापनटेस्टसकाही विषयांचे प्रॅक्टिकल्सगेस्ट लेक्चर्स इ. उपक्रम स्वेरीने यशस्वीपणे राबवले आणि सध्याही ते राबवले जात आहेत.' स्वेरीचे संशोधन अधिष्ठाता डॉ.संतोष साळुंखे यांनी स्वेरीच्या संशोधन कार्यावर प्रकाश टाकला व विविध संशोधन प्रकल्पांना मिळालेल्या निधींबाबत माहिती दिली. स्वेरीच्या प्लेसमेंट व कॉर्पोरेट अफेअर्सचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव यांनी गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या प्लेसमेंटवर प्रकाश टाकला. या मेळाव्यास उपस्थित स्वेरीचे माजी विद्यार्थी हे कोणी प्रशासकिय अधिकारी होतेतर कोणी स्वतःच कंपनीची स्थापना केली होती. कोणी परदेशात स्थायिक झाले आहे तर काहीजण कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी महेश औसेकरहर्षल आवताडेगुरुप्रसाद तेलकरमृण्मय जना-जे सध्या मलेशिया येथे टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस मध्ये सायबर सेक्युरिटी तज्ञ म्हणून काम पाहत आहेत.संजय सावंतशाहिस्ता आतारतरणी कुमार-जे सध्या जपान मध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आपले मनोगत मांडले. 'स्वेरीतील शिस्तीचाशैक्षणिक  संस्कृतीचा व प्राध्यापकांनी आमच्यावर केलेल्या संस्कारांचा आम्हाला खूप फायदा होत आहे. त्यामुळे डॉ.रोंगे सरांना व सर्व प्राध्यापकांना आम्ही मनापासून वंदन करतो.असे मनोगत सर्व माजी विद्यार्थ्यांनी मांडले. या ऑनलाईन मेळाव्यामध्ये स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदेज्येष्ठ विश्वस्त प्रा.सी.बी.नाडगौडायुवा विश्वस्त सुरज रोंगे यांच्यासह स्वेरी अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून ते गतवर्षी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी उपस्थित होते. ‘ऋणानुबंध २०२०’ हा मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अॅण्ड अलूमनी अफेअर्सचे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा.अविनाश मोटेप्लेसमेंट व कॉर्पोरेट अफेअर्सचे अधिष्ठाता प्रा.आशिष जाधवप्रा.सचिन भोसलेप्रा.अंतोष दायडेलॅब असिस्टंट बालाजी सुरवसे यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सोमनाथ ठिगळे यांनी केले, तर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या