रिपोर्टर जागतिक अपंग दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपरिषदे कडून राखीव 5% निधितून प्रत्येक वर्षी रक्कम वर्ग करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी देखील उस्मानाबाद शहरातील एकूण पात्र 379 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5000/- प्रमाणे 18,95000/- एवढी रक्कम धनादेशा द्वारे बॅंके मार्फत देण्यात आली. यावेळी नगरध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, मुख्याधिकारी हरिकल्यान येलगट्टे , नगरसेवक सोमनाथ गुरव, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, प्रदीप घोणे,रवी वाघमारे, गणेश खोचरे, दिपकराव जाधव, अकाउंट विभागाचे अधिकारी सुरज बोर्डे तसेच इतर मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या