प्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीरउस्मानाबाद-रिपोर्टर 


कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर वर्षी पत्रकारिता व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना दिले जाणारे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये अल्पावधीतच महाराष्ट्रात राजकीय कट्टा या युट्यूब व फेसबुक चैनल व वेबपोर्टलचे संपादक प्रा.सतिश मातने यांना सोशल मिडिया वृत्तवाहिनी पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील नामांकित अशा पत्रकारांच्या उपस्थितीत होणार आहे. कळंब तालुका पत्रकार संघ हा राज्यातील नावाजलेला पत्रकार संघ असून या संघाने आतापर्यंत राज्यातील अनेक पत्रकारांचा सन्मान केला आहे. यावर्षी राजकीय कट्टाचे संपादक प्रा.सतिश मातने यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर कौतूक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या