उस्मानाबाद जिल्हयात पदवीधर निवडणुकीसाठी अंदाजे 66.97 टक्के मतदान

 


उस्मानाबाद 
औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले.जिल्हयातील 74 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजल्यापासुन पदवीधर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.पुरूष मतदारासह स्त्री मतदारांनी ही आपला मतदानाचा हक्क बजावला.सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हयात एकुण 66.97 टक्के अंदाजीत मतदान पार पडले.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण व भाजपा महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर आणि अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांच्यात चुरशीचा सामना पाहावयास मिळाला.जिल्हयातील महाविकास आघाडीचे नेते खासदार ओमराजे निबांळकर,आमदार कैलास  पाटील,माजी मंत्री बसवराज पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,डॉ.प्रतापसिंह पाटील,संजय निंबाळकर व इतर नेते,पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासाठी परिश्रम घेत होते.तर भाजपा महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासाठी माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,अॅड.मिलींद पाटील, सुधीर पाटील,अॅड.व्यंकट गुंड,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर यांच्यासह इतर पदाधिकारी,कार्यकर्ते व नेते परिश्रम घेत होते.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 साठी  उस्मानाबाद जिल्हयातील सर्वं 74 मतदान केंद्रांवर शांतेत आणि सुरळीत मतदान संपन्न झाले.  संध्याकाळी 05.00 वाजता मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली त्यानुसार जिल्हयातील 33 हजार 632 मतदारांपैकी 22 हजार 523  पदवीधरानी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 18 हजार 667 पुरूष तर महिला 3 हजार 856 यांनी मतदान केले. शेवटी आलेल्या वृत्तानुसार 66.97 टक्के पदवीधरांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
जिल्हा प्रशासनाच्या कुशल नेतृत्व व निरीक्षणा खाली ही निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पणे शांततेत पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले होते. GPS ट्रॅकिंगच्या माध्यमातून सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि त्यांना नेमून दिलेल्या वाहनाच्या लोकेशन आणि प्रवासावर निरीक्षण ठेवण्यात आले. तसेच वेब कास्टिंग च्या सहाय्याने मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष दिले गेले. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याच्या हेतूने सर्व मतदान केंद्रावर व्हिडिओ शूटिंग आणि वेब कास्टिंग व्दारे मतदान केंद्रावर निरीक्षण करण्यात आले.सर्व मतदान केंद्रांवर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी मतदारांची थर्मल स्कॅनर द्वारे तपासणी करूनच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.
या निवडणूक प्रक्रियेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पदवीधर मतदारांबरोबरच, कष्ट घेतलेले सर्व अधिकारी कर्मचारी आणि पोलीस फोर्स यांनी कौतुकास्पंद कामगिरी केल्या बददल जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिेवेगावकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या