गुत्तेदारी करण्यापेक्षा पदवीधरांचे प्रश्न सोडवने महत्वाचे:रमेश पोकळे


रिपोर्टर 


12 वर्षाच्या काळात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विदयमान आमदार यांनी पदवीधरांच्या प्रश्नापेक्षा गुत्तेदारी करण्यावर भर दिला.त्यामुळे पदवीदरांच्या आडचणी वाढत गेल्या असुन शैक्षणीक क्षेत्रात कामकरण्यासाठी गुत्तेदार किंवा उदयोजक महत्वाचा नसुन शैक्षणीक क्षेत्रातील आडचणी सोडवणारा आभ्यासू आमदार पाहीजे असे मत पदवीधर निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अपक्ष उमेदार रमेश पोकळे यांनी उस्मानाबाद येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.त्याच बरोबर भाजपाने बोराळकर यांना तिकीट दिले नसुन ते विक्री केले आहे.असा आरोप देखील पोकळे यांनी केला.यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पि,एस घाडगे,साचिटनीस व्ही,जी,पवार,डि,एन बनसोडे,राजकुमार कदम यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी विदयमान आमदार आणि भाजपचे उमेदवार यांच्यावर टिका केली.गेली आनेक वर्ष आम्ही पक्ष वाढीसाठी काम केले.मात्र पक्षवाढीसाठी काम न करणाराला पदवीदरचे तिकीट मीळाले हे आमच्यासह पक्षाचे दुर्देव असल्याचे पोकळे यांनी सांगीतले.त्याचबरोबर ज्यांना लगातार दोन टर्म निवडून दिले.ते सतीश चव्हाण यांनी विधीमंडळात प्रश्न मांडण्यापेक्षा गुत्तेदारी करण्यावर भर दिला.मराठवाडयात वाढलेली बेकारी ही विदयमान आमदारंच्या दुर्लक्षामुळे वाढली असुन 6 वर्षानी एकदा तोंड दाखवायला येणा—यांना कसे निवडून देयचे आशा शव्दात विदयमान आमदार सतिश चव्हाण यांच्यावर पोकळे यांनी टिका केली.भाजपचे उमेदवार ​हे जेलवारी करूण आलेले आहेत.त्यांचा आणि शैक्षणीक क्षेत्राचा काही दुरानव्ने संबंध नाही.पक्षवाढीसाठी त्यांचे काम शुण्य आहे.या दोन्ही उमेदवारंच्या बाबतीत मतदारांच्या मनात तिव्र नाराजी आणि संताप असल्याने पुर्ण पदवीधर मतदार माझया पाटीशी आहे.असे मत पोकळे यांनी यावेळी व्यक्त केले.मराठवाडा शिक्षक संघ आणि संभाजी सेना या मोठया संघटना माझया बरोबर आहेत.त्यामुळे विजय आमचाच होणार आसा विश्वासही पोकळे यांनी शेवटी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या