अन्वय नाईक प्रमाणे आमच्या परिवाराला ही न्याय दया : ढवळे


वर्षभरापासुन आरोपी मोकाट 

रिपोर्टर:उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह या आत्महात्या प्रकरणातील आरोपी यांच्यावर तात्काळ कारवाई करूण अन्वय नाईक कुटूंबीया प्रमाणे आमच्या ही कुटूंबास न्याय मिळवून दयावा आशी मागणी 2019 साली फसवनुकीच्या दडपनाखाली येवूण आत्महात्या केलेले शेतकरी दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदना ढवळे यांनी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.आमची जमीन बॉंकेकडे गहाण असल्याने आमच्या कुटूंबाची फरफट थांबत नाही.तरी आमच्या मागणीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष दयावे आशी विनंतीही यावेळी ढवळे परिवाराने केली आहे.


12 एप्रिल 2019 रोजी उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा येथिल शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली.यावेळी ढवळे यांनी आत्महत्या पुर्वी त्यांच्या हास्तक्षरात लिहीलेली चिठठी व शिवसेना प्रमुख या नात्याने उध्दव ठाकरे यांना लिहीलेले पत्र सापडले होते.

त्यानंतर तब्बल पाच महीहण्यांनी पोलीसांनी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या मातोश्री तथा तेरणा करखाण्याच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्यासह इतर आरोपींना जबाबदार धरून कलम 306,420,406,120 या कलमान्वये ढोकी पोलीस ठाण्यात दि.15 सप्टेबर 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र अदयाप या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही.मागील वर्षभरापासुन न्यायासाठी सुरू असलेली माझी आणि कुटूंबाची होत असलेली फरफट थांबवावी आशी विनंती वंदना ढवळे यांनी केली आहे.

आपल्या पक्षाच्या खासदारांनी माझ्या पतीची अर्थिक फसवणूक केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे.गुन्हा दाखल होवून वर्षभर झाले तरी आरोपी मोकाट फिरतात त्यांच्या पासुन आमच्या कुटूंबाच्या जिवीतास धोका आहे.तरी मुख्यमंत्री यांनी नाईक प्रकरणा प्रमाणे  आम्हाला ही न्याय दयावा आशी मागणी ढवळे यांच्या पत्नीने केली आहे.          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या