विधीमंडळात मागील 12 वर्ष सतीश चव्हाण यांनी आमदार म्हणून पदवीधर,शिक्षक,विदयार्थी,गोरगरीब नागरीक,शेतकारी अदिंच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला असुन विधीमंडळात त्यांनी विविध प्रश्न मांडले आहेत.एमपीएससी परिक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढवण्याचा निर्णय,महापोर्टलचा गैरकारभार विधीमंडळात मांडून महापोर्टल रदद करणे,मराठवाडयात नीट परिक्षेचे सेंटर सुरू करणे,असे विविध प्रश्न महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडल्यामुळे त्यांचा या ही वेळी पदवीधर आमदार म्हणून विधीमंडळातील प्रवेश निश्चीत होणार आहे.याची मला खात्री आहे असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उस्मानाबाद येथे आयोजीत पदवीधर मेळाव्यात व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री आब्दूल सत्तार,राज्यमंत्री संजय बनसोडे,शिक्षक आमदार विक्रम काळे,आमदार कैलास पाटील,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजीमंत्री अर्जुन खोतकर,माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड,राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार ,जेष्ठ नेते जीवनराव गोरे,नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,डॉ.प्रतापसिंह पाटील,संजय निंबाळकर, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.धीरज पाटील,विश्वास शिंदे,संपतराव डोके,संजय पाटील दुधगावकर,सक्षणा सलगर,महेंद्र धुरगुडे, अमित शिंदे,धैर्यशिल पाटील, आदिसह राष्ट्रवादी कॉग्रेस,शिवसेना,कॉग्रेस आदि महाविकास आघाडीतील विविध पक्षातील नेते व कार्यकर्तै उपस्थित होते.
या मेळाव्यात पुढे बोलताना ना.जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष भाजपावर टिका करते वेळी सांगितले की कोरोनाच्या संकट काळात ही भारतीय जनता पक्ष विविध आंदोलनाच्या माध्यमातुन राजकारण करत आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकजिनसीपणे एकत्रीतरित्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक—यांना आर्थीक पॉकेज जाहीर करून कोरोना संकट काळातही वेळेत मदत केली. कोरोनामुळे राज्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती.मात्र आता ती सुरळीत होत आहे.त्यामुळे आघाडी सरकार येत्या काळात राज्यातील विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. तुटीचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणा—या मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्याचा व कृष्णा खो—यातील पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते प्रत्येक गोष्टीवर आंदोलन करत आहेत. वास्तविक कोरोना काळात राजकारण आम्ही केले नाही.केंद्र सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन आम्ही केले नाही.परंतु राज्यातील भाजपाचे नेते मात्र प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करत आहेत.देशात इतरत्र कोरेाना रूग्णांमध्ये वाढ होत असताना राज्यात मात्र विविध उपाययोजनामुळे रूग्णांची संख्या कमी होत आहे.उध्दवजीच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे.त्यामुळे सतीश चव्हाण यांना या निवडणुकीच्या माध्यमातुन विधीमंडळात पाठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून पदवीधर मतदारांच्या भेटी घेवून सतीश चव्हाण यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवहान करावे तसेच चव्हाण यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे मंत्री जयंत पाटील यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
या मेळाव्यात बोलताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे राज्यांतील भाजपाच्या नेत्यावर टिका करताना म्हणाले की हे सरकार दोन महिने नव्हे तर दोनशे महीने पडणार नाही विरोधकांनी किती ही मुंगेरीलालची स्वप्ने पाहिली तरी ती पुर्ण होणार नाहीत.महाविकास आघाडीचे नेते शरद पवार,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण पाच वर्ष टिकेल व या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पन्नास हजाराच्या मताधिक्यांनी विजयी होतील असा विश्वास मंत्री श्री सत्तार यांनी व्यक्त केला.यावेळी मेळाव्यात मार्गदर्शन करताना कॉग्रेस चे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे उस्मानाबाद जिल्हयाचे भुमीपुत्र आहेत त्यामुळे त्यांना सर्वाधीक मताधिक्य देवून विजयी करावे आवहान केले. या मेळाव्याचे आभार प्रदर्शन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
0 टिप्पण्या