शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास प्राधान्य दयावे: -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड

रिपोर्टर 

शासनाच्या आनेक योजना जनतेपर्यंत आणि शेतक—यांपर्यंत पोहचत नसल्याने आपल्या भागात शेतकरी आत्महात्या वाढत आहेत.यावर नियत्रंन मिळवायचे असेल तर प्रतेक अधिकारी कर्मचारी यांनी मोकार फिरण्यापेक्षा गावपातळीवरच्या आडचणी समजुन घेवून शासनाच्या प्रतेक योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचवने गरजेचे आहे.असे मत जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी पत्रकारां बरोबर आयोजीत केेलेल्या गेट टुगेदर कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांची उपस्थिती होती.

या दरम्यान बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी सांगीतले की प्रशासनामध्ये काम करणा—या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण वाढत चालले असुन त्याचे परिनाम कार्यालयातील कामावर देखील होत आहेत.यासाठी मी लवकरच अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक बोलवणार असल्याचे फड यांनी सांगीतले.त्याच बरोबर शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवीण्यसाठी   शासकीय अधिका—यांना शासनाच्या प्रतेक योजनेचे परीपुर्ण ज्ञान आसने गरजेचे आहे.त्यासाठी आम्ही तालुका निहाय कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतले.मी असल्यामुळे प्रशासन चालते हा गैरसमज अधिका—यांनी कदापी बाळगू नये असे मत जिल्हा परीषदेमधील अधिका—यांच्या कार्य प्रनालीवर बोताना डॉ.विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.त्याच बरोबर काम सोडून मोकाट फिरणा—या अधिका—यांचाही समाचार घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले.समाजातील प्रतेक घटकावर जर काम करायचे असेल तर त्याची पुर्ण माहीती आगोदर घेणे गरजेचे आहे.आगदी त्या प्रमाणेच शासकीय योजनाची माहीती प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी यांना असने गरजेचे आहे.आणि मी त्यावर जस्त भर देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या