उस्मानाबाद रिपोर्टर
कोणत्याही शासकीय अथवा खासगी कामासाठी एखाद्या अधिकाऱ्याने किंवा व्यक्तीने कामासाठी पैशाची मागणी केल्यास लाच देण्यासाठी नागरिकांनी स्पष्टपणे नाकारले पाहिजे. त्याबरोबरच लाचखोरीला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लाच लुचपत कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबत तक्रारी कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.यावेळी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे व अशोक हुलगे आदी उपस्थित होते.
लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा असून याबाबत कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र याची माहिती अनेक नागरिकांना नसल्यामुळे लाच देतात. याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आमच्या विभागाबरोबरच पत्रकारांनी देखील आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत जनजागृती करण्यासाठी मोठी भूमिका निभावणे महत्त्वाचे असून नागरिकांनी देखील त्यांच्याकडे एखाद्या व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने तसेच कर्मचाऱ्याने शासकीय किंवा खासगी स्वरूपातील काम करण्यासाठी लाच मागितली तर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करूण तक्रार देणे आवश्यक आहे. तक्रार दाखल करणे आवश्यक असून तक्रार दाखल होताच याबाबत खात्रीशीरपणे व निश्चितपणे परंतू अतिशय गुप्तपणे संबंधित लाचखोरा विरोधात कारवाई करण्यात येते. तसेच उस्मानाबाद कार्यालयात याबाबत सतर्कता बाळगण्या बरोबरच ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे लाचलुचपत प्रतिबंधकविभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या