जाफरी सोशल फाउंडेशनच्या वतीने वृध्द व्यक्तीना कपडयाचा आहेररिपोर्टर 

डाळिंब येथील बाबा जाफरी सोशल फाउंडेशन संचलित आधार सेवा केंद्रात वृध्द व्यक्तीना दिवाळीच्या निमीत्ताने कपडयाचा पूर्ण आहेर  दिवाळी साजरी करण्यात आली.

  गेल्या 1 वर्षा पासून या फाउंडेशन तर्फे डाळिंब येथे भोजन सेवा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी 42 वृध्द निर्धार, गरजू व्यक्तींना 2 वेळचे जेवण मोफत दिले जाते, प्रत्येक सणासुदीला त्या सना चे विशिष्ट खाद्य पदार्थ बनवून त्या सणाचे आनंद वृध्द व्यक्तींना व्हावा ह्या दृष्टीने काम केले जाते, त्यांच्या आयुष्यातील सना सुदीचा आनंद हिरावून जाऊ नये, त्याना येणाऱ्या दिपावली ची ओढ राहावी, आणि अशा सना सुदीला मिळणाऱ्या आनंदात त्यांना जीवनातील खडतर दिवस हसत हसत घालवता यावं या उदात्त हेतूने, ह्या दिवाळीत त्यांना पूर्ण ड्रेस, इरकल साडी, झापिल साडी अश्या  योग्य कपड्याचे भरती आहेर संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

 या कार्यक्रमा साठी उमरगा तहसीलदार पवार साहेब हे आवर्जून उपस्तीत होते, त्याच बरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबुरावजी टिकम्बरे, तर प्रमुख उपस्तीत म्हणून, युसूफ मुल्ला सर, सचिन बिद्री, भूमिपुत्र वाघ, मधुकर गुरुजी, डोंगरे गुरुजी, जब्बार पटेल, इकबाल चौधरी, पोलीस पाटील अश्विनी वाले, गावातील मान्यवर व मित्रमंडळी उपस्तीत होते. याच कार्यक्रमात वैधकीय प्रवेश मिळवलेला विद्यार्थी मंगेश पाटील यांचे पण सत्कार करण्यात आले... सूत्र संचालन बसवराज सारने, बाबा जाफरी यांनी प्रास्ताविक तर गणेश इगवे यांनी आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या