पक्षी सप्ताहाच्या निमीत्त वन विभागाच्या वतीने पक्षी निरीक्षण कार्यक्रम

 
उस्मानाबाद रिपोर्टर 

जगभरातील जैवविविधता झपाटयाने कमी होत असल्याने राज्यातील पक्षाचे महत्व प्रतेक नागरिकांपर्यत पोहचवून त्यांच्या संवर्धण व संरक्षणाप्रती जनजागृती व्हावी म्हणुन विश्वामध्ये अग्रणी असलेले पदमभुषण स्व.डॉ.सलील अली तसेच जेष्ठ साहित्यीक व सेवा निवृत्त वन अधिकारी मारूती चित्तमपल्ली यांच्या जन्म दिनांचे औचित्य साधुन वनविभागाच्या वतीने पक्षी निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

उस्मानाबाद,तुळजापुर परिक्षेत्र नव विभागाच्या वतीने शहरालगत असलेल्या हातलादेवी वनक्षेत्र परिसरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.दोन ते तिन तासाच्या काळावधीमध्ये 50 हुन अधिक पक्षाच्या प्रजातींची नोंद घेण्यात आली. यामध्ये राखी बगळा,वनचक,छोटा बगळा,गाय बंगळा,खंडया,चित्र बलक,कांडेसर,काळा शराटी,चमचा,प्फावर,चांदना,पिवळा भवईचा धोबी,कपाशी घार, बुलबुल,राखी वटवडया,राघु,टिटवी,नंदीसुरच,तितर,जांभळी,पाणकोंबडी, तपकीरी फटाकडी,तुतवार, डोंबारी शेकाटया,पठाणी होला,इत्यादीसह 50 पेक्षा अधिक प्रजातीची नोंद घेण्यात आली.यावेळी वन विभागाचे नवाधिकारी कर्मचारी तसेच पक्षीमित्र मोठया संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या