ग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी

 

रिपोर्टर 

ग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड करूण कामगारांना न्याय देण्यासाठी वार्तांकण करणा—या प्रतिनिधीला ग्रामपंचायतमध्ये येण्यास मज्जाव केला असल्याची बाब निदर्शनास आली आहे.आशा ग्रामसेवकावर वरिष्ठ पातळी वरूण कारवाई होणे गरजेचे आहे.


वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायतमध्ये काम करणा—या कर्मचा—यांचा आनेक वर्षाचा राहणीमान भत्ता आणि पिएफची रक्कम मिळत नसल्याची बातमी दैनिक लोकशाशनमध्ये 31 आक्टोबरच्या अंकात प्रकाशित झाली होती.या बातमीचे वार्तांकण करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधीला ग्रामपंचायतमध्ये येण्यास बंदी करा असे बावी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी पंचायत कर्मचा—यांना सांगीतले आसल्याची माहीती समोर आली आहे. बावी ग्रामपंचायतमधील तिन कर्मचा—यांचा आनेक वर्षाचा राहणीमान भत्ता आणि पिएफची लाखो रूपयांची रक्कम ग्रामसेवकाच्या हालगर्जीपणामुळे थकित आहे.वारंवार मागणी करूण ही रक्कम मिळत नसल्याने पंचायत कर्मचा—यांनी 2 नोव्हेबर म्हणजेच आज पासुन उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भात जिल्हा प्रशासना ने विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकाला जिम्मेदार धरूण त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश 15 जुलै 2019 रोजी दिले आहेत.तरी सुध्दा या प्रकरणात कुठल्याही अधिकार—यावर अदयाप कारवाई झालेली नाही.कोरोनाच्या काळात  तटस्त सेवा देणा—या कर्मचा—यांना त्यांच्या हाक्काचे पैसे मिळणे गरजेचे होते मात्र त्यांना कष्टाच्या मोबदल्या पासुन वंचित राहण्याची वेळ ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे आली आहे.हे संगळे प्रकरण समोर आनण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये गेलेल्या माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला का? आलर्जी झाली हे मात्र कौतुकास्पद आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या