धाराशिव कारखाण्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड: 2962 शेतकऱ्यांना 2 कोटी 23 लाखांचे वाटप


 उस्मानाबाद रिपोर्टर 

धाराशिव साखर कारखाण्याकडून शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर २०० रूपयाचा हाप्ता आणि साखर वाटप करण्यात आली. अतिवृस्टसह नैसर्गीक संकटात आसलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे पुण्य कारखाण्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले असुन 2962 उसधारक शेतकऱ्यांना 2 कोटी 23 लाख 5 हजार रूपयांचे वाटप कारखाण्याकडून करण्यात आले आहे. 

 

कोरोना महामारी आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कितपत गोड होईल याबाबत शंका उपस्थित होत असताना पंढरीतील डिव्हीपी उद्योग समूहाच्या धाराशिव साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून २०० रुपयांचा तिसरा हाप्ता व साखर वाटप करून जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे.यामुळे दोन दोन वर्षांपासून ऊस बिले थकवून शेतकऱ्यांना अडचणीत आणनाऱ्या पंढरपूर तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक कारखाण्या समोर हा एक आदर्शच म्हणावा लागेल.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पोळा,दिवाळी हे महत्वाचे सन असतात, कै.औदुंबर आण्णा पाटील यांच्या काळात या सणांची शेतकऱ्यांना ओढ लागलेली असायची.कारण या दोन्ही सनांच्या वेळी साखर कारखान्यांकडून ऊस बिलांचे हप्ते शेतकऱ्यांना मिळत असायचे.त्यामुळे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेत धाराशिव कारखान्याने जुन्या परंपरेला उजाळा देत शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी २०० रूपयाचा हाप्ता वाटप केला आहे. गेल्यावर्षी ऊसाचे प्रमाण कमी असूनही कारखाना सुरू केला.कामगारांना आणि कारखाना भागातील शेतकऱ्यांना न्याय देऊन चेअरमन अभिजीत पाटील यांनी २५०० रूपये दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे २१०० रूपयाचा पहिला हाफ्ता म्हणून वाटप केले,तर पोळासणासाठी २०० रूपये. शेतकऱ्यांना देण्यात आले होते.उर्वरित २०० रुपये. दिवाळीसणात देण्यात येतील असे डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले होते.त्याप्रमाणे दिवाळीच्या तोंडावर या हाप्त्याचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करताना अनेक अडचणी येत असतात. या अडचणी लक्षात घेऊन येत्या काळात शेतकऱ्यांनी ऊसाचे एकरी उत्पादन जास्तीत जास्त वाढावे यासाठी डिव्हिपी उद्योग समूहाच्यावतीने शेतकरी मार्गदर्शन, शेतकरी मेळावा, ऊस उत्पादन वाढीसाठी विविध विकास उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करावी. ऊस संपे पर्यंत धाराशिव कारखाना गाळप करेल प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवडी बरोबर एकरी उत्पादन वाढीवर भर द्यावा,असे सांगुन चेअरमन अभिजित पाटील यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छाही दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या