आकाशातून पडलेली सोन्याची बिस्किटे वेचण्यासाठी सुरतमध्ये लोकांची गर्दी

रिपोर्टर गुजरातमधे सुरत जवळील सेहेनी गावात बुधवारी रात्री सोन्याची बिस्कीटे आकाशातून पडल्याने लोकांनी एकच गर्दी केली. ही माहिती आजूबाजूच्या गावात पसरल्यानंतर तिथूनही माणसं या गावात आली मात्र तोपर्यंत रस्त्यांवर व शेतात पडलेली नाणी संपलेली होती. ही नाणी सोन्या सारखी दिसत असली तरी ती नक्की सोन्याची आहेत की पितळेची ते अद्याप समजलेले नाही.

बुधवारी रात्री सेहेनी गावातील काही लोकं अंधारातून जात असताना त्यांना शेतात काहीतरी चमकती वस्तू पडल्याचे दिसले. त्यांनी शोधाशोध केली असता त्यांना सोन्यासारखी दिसणारी छोटी बिस्किटे दिसली. त्यांनी ती जमा केली. त्यानंतर इतर गावकऱ्यांनाही त्याबाबत कळवले. त्यानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. अनेक गावकरी रात्रभर टॉर्चच्या प्रकाशात सोन्याची बिस्किटे शोधत होती. काहींना बिस्किटे मिळाली तर काहींच्या हाती काहीच लागले नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आजुबाजुच्या गावातील नागरिकही सोन्याच्या बिस्किटांसाठी गर्दी करू लागले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या