रिपोर्टर
भूम तालुक्यातील हाडोंग्री या गावांमध्ये गुरुवारी पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाचे पाणी काळे आसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामस्तांनी पन्हाळ्याला बादली बकेट घागरी भरून ठेवल्यावर हे पाणी काळ्या रंगाचा असल्याचे समजले. आशा प्रकारचा पाऊस पडल्याने गावामध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले.सदर पाण्याचे नमुने प्रशाशनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत..गेल्या बरेच दिवसांपासून भरपूर पाऊस झाल्याने पत्र सुद्धा चांगले धुवून निघाले होते .माञ काळा पाउस कसा पडला. याची चर्चा संगळीकडे सुरु आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हडोंग्रीकर यांनीही या प्रकाराचे चौकशी करावी असे शासनाला आव्हान केले. मुक्ता आप्पा तळेकर, सुखदेव पालकर , बाळासाहेब मुळे व येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या