भविष्यात येणाऱ्या अडचणी समोर ठेवून काम करावे- राज्यमंत्री सत्तार

उस्मानाबाद रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हयात अतिवृष्टी, पुर व कोरोना या संकटामध्ये जिल्हयात उध्दभलेल्या परिस्थितीला व्य्वस्थित हाताळून या संकटावर मात करुन जिल्हावासियांना विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासाने भविष्यात येणाऱ्या अडचणी काम करावे असे निर्देश महसुल,ग्रामविकास, बंधरे,खार जमीनी विकास, विशेष सहाय्यक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले, दरम्यान त्यांनी अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील गावांना भेठी देवून झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दि.20 ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी, वलगुड, झरेगांव, चिलवडी, सुर्डी, व बेगडा या गावच्या शिवारातील नुकसान झालेल्या पिकांची व खरडुन गेलेल्या जमिनीची तसेच फुटलेल्या बंधा-यांची बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची आपुलकीने व आत्मियतेने विचारपुस केली. तसेच शेतकऱ्यांना तुम्ही घाबरु नका शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन देत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला तर नुकसानीचे पंचनामे ग्रामसेवक तलाठी व पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तात्काळ करण्याचा सुचनाही त्यांना दिल्या यावेळी  खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आ. कैलास घाडगे –पाटील नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे , गटविकास अधिकारी समृध्दी दिवाने आदी उपस्थित होते.

यावेळी सत्तार यांनी शेत रस्ते बंधारे दुरुस्ती व ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीची कामे मनरेगा योजनेच्या माध्यमातून करण्याच्या सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणी केल्यानंतर सत्तार जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी व माझे कुंटुब, माझी जबाबदारी या बाबत आढावा बैढक घेतली. त्यावेळी आ. कैलास घाडगे- पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर , विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, अति.जिल्हाधिकारी रुपाली डाबे-आवले, जिल्हा अधिक्ष्क  कृषि अधिकारी डॉ. उमेश घाटगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे आदीसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना राज्यमंत्री सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांचे सोयाबीन खराब झाले असून ते खरेदी करण्यासाठी जिल्हयात खरेदीकेंद्रे सुरु करावीत, पुरामुळे माती वाहुन गेलेल्या ठिकाणचे पंचनामे करावे. पंचनामे करतांना कोणीही या पंचनाम्यापासुन वंचित राहणार नाही यासाठी अधिकारी म्हणून जबाबदारीने काम करावे, कांदयासह सर्व पिकांचे पंचनामे करण्याबरोबरच शेतकऱ्यांशी सभ्यपणाने बोलून त्यांना धिर देण्याचा प्रयत्न करावा. तसेच पिक विमा कंपनीचा अधिकाऱ्यांने कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेले पंचनामे ग्राहय धरावेत. ज्या शेतात पाणी साठून राहून त्या जमीनीत चिबडाच्या बनलेल्या आहेत अशा ठिकाणी पाण्याचा निचरा काडून देणे,  जूने बंधारे दुरुस्तीसाठीचा आराखडा तयार करावा. तसेच माझे कुंटुंब, माझी जबाबदारी या मोहीमे अंतर्गत आरोग्य विभाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाय योजना व कामाबाबत समाधान व्यक्त्‍ करीत मृत्यु दराचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वाशी, कळंब व भुम या तालुक्यात मोठया प्रमाणावर आरोग्य जनजागृती जास्ती भर दयावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या