परतीच्या पावसाने तुळजापूर तालुक्यातील काही गावात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जिल्हा दौ—यावर आले आसता मतदार संघातील झालेले नुकसान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दाखवण्यासाठी पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून आमदार राणाजगजितसिंह पाटील मुख्यमंत्री यांच्या दौ—यात हाजर झाले.
आतिवृस्टीमुळे तुळजापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची मदत लवकर शेतकऱ्यांना मिळावी आशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे यावेळी केली.तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा,कात्री या दोन गावामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.सोयाबीन,कांदा,उस,आदि पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या बरोबरच आपसिंगा गावातील घरामध्ये पाणी शिरून संसार उपयोगी वस्तू वाहुण गेल्या आहेत.हे सर्व झालेले नुकसान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्व:ता हाजर राहुन मुख्यमंत्री यांना दाखवले.आणि लवकरात लवकर मदत मिळावी आशी मागणी केली.
0 टिप्पण्या