हक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा


रिपोर्टर 
आनेक वर्षापासुन थकीत असलेला राहणीमान भत्ता आणि पीएफचे लाखो रूपये मिळावेत यासाठी ग्रामपंचायतच्या कर्मचा—यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.आमच्या हक्काचे पैसे सनासुदीच्या तोंडावर आम्हाला नाही मिळाले तर 2 नोव्हेबर पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायच्या कामगारांनी प्रशासनाला दिला आहे.

वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायत मधे काम करणारे महादेव शिंदे,किरण शिंदे आणि कालीदास शिंदे हे आनेक वर्षापासुन गावातील ग्रामपंचायत मध्ये शिपाई कामगार या पदावर आहेत.मागील काही वर्षापासुन या तिन कर्मचा—यांचा राहणीमान भत्ता आणि पिएफची रक्कम ग्रामपंचायतच्या माध्यमातुन प्रशासनाकडे थकीत आहे.कामाची योग्य जिम्मेदारी पार पाडून हाक्काचे पैसे मिळत नसल्याने हे कर्मचारी चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.तिन कर्मचा—यांचे लाखो रूपये प्रशानाकडे असुन ग्रामसेवकासह प्रशासन याची दखल घेत नसल्यासने 2 नोव्हेबर पासुन आमरण उपोषण करणार आसल्या बाबात कर्मचा—यांनी प्रशासनास निवेदन दिले आहे.कोरोनाच्या काळात गावपातळीवरती जिव धोक्यात घालुन काम करणारे पंचायत कर्मचारी  हक्काच्या पेशा पासुन वंचित राहत आसतील तर त्यांनी आपले कुटूंब चालवायचे कसे हा प्रश्न त्यांना सतावत आसल्याचे त्यांनी दैनिक लोकशाशनशी बोलताना त्यांनी सांगीतले.


​थकीत रकमेला ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी जिम्मेदार 

या थकीत रकमेला ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी जिम्मेदार असुन त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश 2019 ला प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरूण देण्यात आले आहेत.तेव्हा पासुन कारवाई ही नाही आणि या कामगारांना पैसे ​ही मिळाले नसल्याने सदर ग्रामपंचायत कर्मचा—यांनी उपोषण करण्याचे ठरवले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या