खासदार शरद पवार यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची केली पाहणी




रिपोर्टर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस चे अध्यक्ष शरद पवार हे आज उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ—यावर आहेत तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथुन नुकसानीची पाहीणी करण्यास सुरूवात झाल्यावर या ठिकाणच्या शेतक—यांनी शरद पवार यांच्याकडे मदतीची मागणी केली. 

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वात नुकसान झालेल्या उस्मानाबाद, औसा,तुळजापूर,परांडा,उमरगा,लोहारा या तालुक्यात सोयाबीन,उस,कापूस अदि पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.उस्मानाबाद जिल्हयात 4 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती.मात्र यापैकी मोठया प्रमाणात सोयाबीन हे पावसाने होत्याचे नव्हते केले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी मोठया अर्थिक संकटात सापडला आहे.झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी आज पवार मराठवाडयाच्या दौ—यावर आहेत. खासदार शरद पवार यांनी या दो—याची सुरूवात उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यापासुन केली या वेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या आडचनी जानूण घेतल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या