उस्मानाबाद रिपोर्टर
काही काळ शिवसेनेसाठी आगदी जवळचे आणि महत्वाचे निर्णय घेणारे भुम परंडा वाशी मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रा.तानाजी सांवत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौ—याकडे चक्क पाठ फिरावली. यामुळे तुळजापूर तालुक्यातील पाहणी दौ—यात आमदार सावंत नसल्याची चर्चा वारंवार एैकायला मिळाली.
गेल्या विधानसभेला माजी आमदार मोटेंचा पराभव करूण भूम,परंडा,वाशी मतदार संघातून आमदार प्रा.तानाजी सावंत हे निवडून आले.मात्र महाआघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज झाले. त्यांची नाराजी आनखी आसल्याची चर्चा एैकायला मिळत आहे.परतीच्या पावसाने उस्मानाबाद जिल्हयात काही ठिकाणी मोठे नुकसान केले आहे.त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेच्या सरकार मधील आनेक मंत्री उस्मानाबाद जिल्हयाला भेट देवून गेले.मात्र आमदार तानाजी सावंत हे कुठेच दिसले नाहीत.महत्वाचे म्हणजे बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे उस्मानाबाद जिल्हा दौ—यावर आले आसता आमदार सावंत कुठेही दिसले नाहीत.आमदार सावंत पक्ष बदलणार आहेत का? सावंत मुख्यमंत्री आल्यावर सुध्दा आले नाहीत,आशा प्रकारच्या चर्चा मुख्यमंत्री यांच्या दौ—यात एैकायला मिळत होत्या.महत्वाचे म्हणजे या दौ—यात शिवसेनेचे आमदार,खासदार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची झाडून हाजेरी होती.
0 टिप्पण्या