सीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले,धरनाचे ४ दरवाजे उघडले


रिपोर्टर

परंडा तालूक्यातील ५ टी.एमसी क्षमता असलेला  सीना कोळेगाव धरण  १०० टक्के भरले आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता सीना कोळेगाव धरणात पाणीसाठा १०० टक्के झाल्याने रात्री सीना कोळेगाव धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सध्या प्रतिसेकंद २४०० क्युसेकचा विसर्ग सुरू केला आहे. 

सीना कोळेगाव धरण भरल्याने सीना कोळेगाव धरणाच्या २१ दरवाज्या पैकी चार दखान्यातुन २४०० क्युसेकने पाणी सिना नदीत सोडण्यात आले. सततच्या दुष्काळा मुळे निराश झालेल्या शेतकऱ्यामध्ये या वर्षी दमदार पाऊस होऊन धरण भरल्याने परंडा तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

परंडा तालूक्यातील साकत मध्यम प्रकल्प वगळता या वर्षी तालूक्यातील खासापुरी , चांदणी प्रकल्पा सह छोटे छोटे प्रकल्प  पूर्ण भरले आहेत. त्यामुळे जास्तीचे पाणी धरणांच्या सांडव्यामधून सीना  नदीपात्रात मोठया प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आलेले आहे.

पावसाळा संपत आला तरी परंडा तालूक्यात समाधान कारक पाऊस पडलेला नव्हता मात्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे .

दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय अशी चिंता शेतकऱ्या मध्ये निर्माण झाली होती मात्र परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या