वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन

 

रिपोर्टर 

हदगाव आणि नांदेड जिल्ह्यात वैराग्यमूर्ती म्हणून ओळखले जाणारे दत्ता बापू ज्यांनी हदगाव मध्ये अत्यंत निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा केली स्वतः आयुष्यभर पायामध्ये वाहन वापरले नाही पण समाजामधील गोरगरीब पोरं शिकली पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः मुलांचे वस्तीग्रह चालवले तसेच गोरगरिबांची लग्न कमी खर्चामध्ये व्हावे यासाठी त्यांनी तीन मंगल कार्यालय यांनी बांधलीआणि अत्यंत स्वस्त दरामध्ये अनेकांची लग्न लावण्याचे काम ज्यांनी केले असा हा संत रस्त्याने निघाला तर त्यांच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी उकडुन तिकडून लोक रस्त्यावर उभी राहत होते इतकेच नाही तर एवढं मोठं प्रस्थ उभं केलेलं असताना सुद्धा दर शुक्रवारी बाजारांमध्ये फिरून भिक्षा मागण्याचे काम कधी या वैराग्यमूर्ती ने सोडले नाही कृष्ण मंदिर नावांचे खूप मोठे मंदिर हादगाव शहरांमध्ये त्यांनी लोकवर्गणीतून बांधून काढले हदगाव

 येथील श्रीकृष्ण मठाचे मठाधिपती परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू  हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १८ सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला असून ते आनंतात विलीन झाले आहे १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२-३० वाजता उखळाई आश्रम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  करण्यात आले कर्मचारी प्रगत शेतकरी सच्च्या समाजसेवक श्रीकृष्ण मठाचे मठधिपती हदगाव तालुक्यातील भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या लाखो भक्तांमध्ये शोकाकुळ पसरली होती त्यांच्या पार्थिवावर १९-९-२०२० रोजी दुपारी ४ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार होते परंतु भक्ताची होत असलेली हजारो ची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या आदेशा वरून दुपारी १२-३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या