गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शनिवारच्या जनता कर्फ्युमध्ये शिथिलता





रिपोर्टर: संसर्गजन्य कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उस्मानाबाद जिल्हयात दर शनिवारी जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता. मात्र उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गणेश मूर्ती व इतर साहित्याची खरेदी करता यावी, यासाठी शनिवार रोजीच्या जनता कर्फ्यूमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याबाबतचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवार रोजी आदेश जारी केले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नागरिकांना गणेशोत्सवाच्या कालावधीत श्री गणेश मुर्ती व इतर साहित्याची खरेदी करता यावी, याकरीता शनिवार दि. 22 ऑगस्ट व दि. 29 ऑगस्ट रोजीच्या जनता कर्फ्यूमध्ये पुढील बाबीमध्ये शिथिलता देण्यात येत आहे.
1) जनता कर्फ्यू दिवशी श्री गणेश मूर्तीची व श्री गणेश उत्सवाकरीता लागणा-या साहित्याची विकी करणारी दुकाने चालू ठेवण्यास परवानगी राहील.
2) या दुकाना व्यतिरिक्त अन्य दुकाने व बाजारपेठ तसेच आस्थापना यांच्याकरीता दि. 22 व 29 रोजीचा जनता कर्फ्यू पुर्वीप्रमाणेच लागू राहील.
या आदेशाची कडक अंमलबजावणी  सर्व संबंधित यंत्रणेने करावे, कुठल्याही व्यक्तीकडून आदेशाचे उल्लघंन झाल्यास, त्याच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.*नव्या जिल्हाधिकाऱ्यांचा कामाचा श्रीगणेशा गणेशोत्सवासाठी २२ आणि २९ ऑगस्ट रोजी जनता कर्फ्यु मध्ये शिथिलता* 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या