राज्यात अनेक ठिकाणी एसटी प्रवाशांविना धावली
 रिपोर्टर: राज्यात 20 आॅगस्ट रोजी पासुन एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली. परंतु अनेक ठिकाणी एखाद-दुसरा प्रवासी सोडला तर बस विनाप्रवाशीच धावत असल्याचे चित्र आहे.

राज्यात सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. परंतु राज्यातील अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवली असुन 20 आॅगस्ट रोजी सकाळीपासून बहुतेक बस मोकळ्याच सोडण्यात आल्या. गेल्या पाच महिन्यापासून एसटी बसची आंतरजिल्हा सेवा बंद होती, त्यामुळे आजपासून बाहेर जिल्ह्यात जाणारे प्रवासी गर्दी करतील अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र आज सकाळपासून एखादा प्रवासी वगळता प्रवाशांनी बस प्रवास टाळल्याचे दिसत आहे. आज पहिला दिवस असल्याने प्रवासी नसले तरी हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास प्रशासनाला वाटत आहे.
त्यातुनच आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी असल्याचे दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या