वृत्तसंस्था
भारताची पहिली कोरोना लस 'कोविशिल्ड'73 दिवसांत बाजारात उपलब्ध होईल. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार देशातील नागरिकांना मोफत कोरोना लसीकरण करणार आहे.
पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, भारत सरकारने आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना दिला आहे.या नुसार कोविशिल्डची चाचणी 58 दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस शनिवारी देण्यात आला आहे. दुसरा डोस 29 दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर १५ दिवसांनंतर येईल. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असे सांगितले जात होते.
चाचणी प्रक्रियेला आतापासूनच वेग आला आहे. कोविशिल्ड लशीची चाचणी 17 केंद्रांमधील 1600 लोकांमध्ये 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये, प्रत्येक केंद्रातील सुमारे 100 लोकांवर कोरोना लशीची चाचणी घेण्यात येत आहे.
ही लस सीरम इंस्टिट्यूटची असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीरम इंस्टिट्यूटने अॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे अधिकार खरेदी केले आहेत.
तत्पूर्वी केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, ते थेट सीरम इंस्टीट्यूटकडून कोविशिल्ड लस खरेदी करतील आणि कोरोना लस भारतीयांना मोफत देतील. भारत सरकार जून 2022 पर्यंत सीरम इन्स्टिट्यूटकडून 68 कोटी लस खरेदी करेल. केंद्र सरकार राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत भारतीयांना मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. भारताची लोकसंख्या सध्या सुमारे 130 कोटी आहे. सीरमकडून 68 कोटी डोसची खरेदी केल्यानंतर उर्वरित लशीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या कोवाक्सिन तसेच खासगी फार्मा कंपनी Zydus Cadila द्वारे विकसित होत असलेल्या ZyCoV-D ऑर्डर देऊ शकतात. मात्र या कंपन्यांच्या कोरोना लस चाचण्या यशस्वी झाल्या पाहिजेत.
भारत बायोटेकने अद्यापही लशीची चाचणी कधी व केव्हा सुरू होईल हे सांगितले नाही. तथापि, भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा अल्ला यांनी म्हटले आहे की, लशीची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यापूर्वी त्याच्या उत्पादनात कोणताही शॉर्ट कट वापरला जाणार नाही. तर दुसरीकडे सीरम इंस्टीट्यूट दरमहा कोरोना लसीचे 6 कोटी डोस तयार करण्याचे काम करत आहे. एप्रिल 2021पर्यंत ही क्षमता दरमहा 10 कोटी डोस बनवेल.
0 टिप्पण्या