रिपोर्टर:कोरोनामुळे शाळा बंद असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे डिजिटल कौशल्ये नसल्याचे समोर आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ७२.२ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाचे डिजिटल पर्याय वापरायचे कसे, याचे ज्ञान नाही. डिजिटल युगात हे पालक ऑफलाइनच असून ते आपल्या पाल्याला ऑनलाइन शिक्षणाचे धडे कसे देणार असा प्रश्न आता समोर आला आहे.
एमएससीईआरटीने नुकताच ‘लर्निंग फ्रॉम होमची सुविधा व वापर’ याविषयी सर्वेक्षण केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके यासाठी निवडण्यात आले. ७६० शाळांपैकी ७३७ शाळांतील पहिली ते आठवीच्या ७,६०० विद्यार्थ्यांपैकी ६,८५५ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ५,४०९ विद्यार्थी ग्रामीण तर १४४६ विद्यार्थी शहरी भागातील होते. यात ३३०४ मुले तर ३३५१ मुली होत्या, अशी माहिती एमएससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
लर्निंग फ्रॉम होममध्ये पालकांना अडचणी
– पूर्ण कुटुंबात एकच फोन.
– पालकांमध्ये डिजीटल क्षमतांचा अभाव.
– मुले अधिक वेळ मोबाईल गेम खेळतात.
– मुलांच्या मातृभाषेतून शैक्षणिक साहित्य नाही.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण न मिळण्याची कारणे
३ हजार ३९१ विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात लर्निंग फ्रॉम होमची विविध माध्यमे न वापराची काही कारणे समोर आली आहेत. त्यापैकी पालकांकडे डिजिटल कौशल्ये नाही हे प्रमुख कारण आहे. त्याखालोखाल ६६.४ टक्के मुलांच्या घरी स्मार्टफोन नाही. तसेच अनुसूचित जाती जमातीतील ४२.६ टक्के कुटुंबांनाच स्मार्टफोन वापरता येतो. ५२.३ टक्के कुटुंबातील मुलांकडे इंटरनेट नाही. ३५.२ टक्के मुलांच्या घरी नेटवर्कची समस्या आहे. ३०.२ टक्के मुलांच्या घरी रेडिओ अथवा टीव्हीदेखील नसल्याचे समोर आले आहे. तसेच २२ टक्के मुलांच्या पालकांकडे फोन रिचार्ज करण्यासाठी पैसेदेखील नाहीत.
डेस्कटॉप, लॅपटॉपची कमतरता
एकूण मुलांच्या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचे प्रमाण नगण्य आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुलांपैकी प्रत्येकी केवळ ०.८ टक्के मुलांकडे डेस्कटॉप आणि लॅपटॉप आहेत. इतर सोईसुविधा असलेल्या घरांची टक्के वारी खालीलप्रमाणे –
फोन ९४.८
वीज जोडणी ९१.९
टीव्ही ६९.३
स्मार्ट फोन ५९.८
इंटरनेट ५६.५
टीव्ही मोफत ४१.८
जोडणी
रेडिओ ३८.७
विभागानुसार टक्केवारी खालीलप्रमाणे
मुंबई ६७.५
पुणे ६४.४
कोल्हापूर ५४
लातूर ५४
नाशिक ५२.९
संभाजी नगर ५१
नागपूर ४२.५
कोकण ३८.६
अमरावती ३१.४
विभागानुसार शैक्षणिक साहित्याचा वापर
आँनलाईन शिक्षण साहित्य वापरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोकण, नागपूर आणि अमरावती विभागाती मुले मागे आहेत. तर मुंबई विभागात हे प्रमाण अधिक आहे.
0 टिप्पण्या