महाराष्ट्रात काही जिल्हयामध्ये आनखी 8 ते 10 दिवसांची संचार बंदी
रिपोर्टर:राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा १ लाखाच्या पार पोहोचला असला तरी कोरोनाशी युद्ध अजून संपलेले नाही. वाढत्या प्रकोपामुळे औरंगाबाद, बीड, परभणी, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अक्कलकोट, नाशिक शहरांसह विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा ८ ते १० दिवसांची संचारबंदी, जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

  दररोज रुग्णसंख्येचा वेग वाढल्याने राज्यातील १९ शहरांमध्ये संचारबंदी, जनता कर्फ्यू लागू करून कोरोना साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मंुबई प्राधिकरणाच्या ५ महापालिका क्षेत्रांत लाॅकडाऊनबाबत आपल्याला विश्वासात घेतलेले नाही, अशी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची तक्रार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. यासंदर्भात पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या