लग्न सोहळयात 17 जण झाले पोजिटीव्ही आडीच शे जणांवर गुन्हा दाखल..विनापरवाना लावले लग्न


भूम-मुकुंद लगाडे
 
 रिपोर्टर: तालुक्यातील राळेंसांगवी ता.भूम येथे दि 29 जून रोजी दुपारी 12 वाजता विना परवाना 200 ते 250 लोकांच्या जमावाने लग्न कार्य  केले असून या लग्नकार्यास लोकप्रतिनिधी सह नेते लोक उपस्थित असल्याचे समजते.राळेंसांगवी चे ग्रामसेवक सौ सुषमा स्वामी यांच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल 13 दिवसांनी गुन्हा दाखल.
 हा लग्न कार्य करणारे दत्ता टाळके यांनी आपल्या मुलीचा विवाह प्रसंगी पाहुण्यांना स्वतःच्या  इनोव्हा गाडीतून लोकांना ने आन केले तसेच गाडी मधून भाजीपाला विक्री  करून कोरोना संसर्ग पसरविला असल्याचे पोलिसांना दिसून आले ते लग्नाच्या नंतर  चार दिवसांनी त्रास होत असल्याने भूम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असता तो कोरोना पोजिटीव्ही आला तद नंतर त्याचा सानिध्यात असणारे 17 जण पोजिटीव्ही निघाल्याने व दत्तात्रय टाळके यांनी कोविड 19 संदर्भात शासकीय आदेशा चे उलघन करून इतर लोकांच्या जिवावर बेतेल असे वागल्याने त्याच्यावर  सोबत लग्नातील सर्वांवर  भदवी कलम 188,269 प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 5 ब प्रमाणे साथरोग प्रतिबंध कायदा कलम 2,3,4,व महाराष्ट्र कोविड19 कायदा कलम 11 प्रमाणे भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश गडवे हे करित आहेत .
मात्र गावातील कोरोना कक्ष व  तालुका कोरोना कक्ष अधीकारी यांनी या विवाह कडे दुर्लक्ष केल्याने यांना माहिती असताना गुन्हा अद्याप न केल्याने संसर्ग वाढला असल्याचे बोलले जाते.कोरोना संसर्ग वाढेपर्यंत अधिकारी गप्प का ? संसर्ग वाढवण्यात कक्ष अधिकारी
जबाबदार आहेत.का? मोठ्या स्वरूपात लग्न मात्र प्रशासन गप्प का? असे नागरिकांत बोलले जात आहे.

    भूम पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ.

 जर कोणी असे विना परवाना व शासकीय नियमांना कलाटणी देऊन असे कार्य करीत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावरही कडक कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येणार :- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या