कळंबच्या तहसिलदार मंजूषा लटपटे काठी घेउन उतरल्या कन्टेंमेंन्ट झोन मध्ये



रिपोर्टर: कळंब तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तहसिलदार मंजूषा लटपटे यांनी तालुक्यातील गावोगावी फिरूण कोरोना ला हारवण्यासाठी जनजागृती केली आहे.त्याच बरोबर रेडझोन असलेल्या शिराढोन गावात स्वतहा हातात काठी घेवून कर्तव्य बजावत असलेल्या लटपटे यांचे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र कौतूक होत आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा झपाटयाने वाढत असुन तालुक्यातील प्रशासन झटकून कामाला लागले आहे.या संगळया प्रशासकीय नियोजनामध्ये कळंबच्या तहसिलदार मंजूषा लटपटे यांचे योगदान मोलाचे आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर   सुरूवातीपासुनच योग्य नियोजन आणि केंद्र आणि राज्य सरकारचे नियम जनतेपर्यंत पोहचवून त्याचे कडेकोट पालन कसे होईल या मार्गाने लटपटे यांनी काम पाहीले आहे.त्याच बरोबर तलुका वैदयकीय अधिकारी डॉ.प्रदिपकुमार जाधव यांनी ही आपले कर्तव्य पनाला लावत तलुक्यातील कोरोना नाहीसा करण्यासाठी काम केले आहे.कोरोनाच्या रूग्णांबरोबरच बाहेरूण तालुक्यात येणा—या लोकांवर लक्ष ठेवून त्यांना क्वरंटाईन करणे सरकारची वेळोवेळी आलेली नियमावली त्याचे पालन करूण तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेवून लॉकडाउनचा कालावधी यशस्वीरित्या पार पाढण्यात तालुका प्रशासनास यश आले आहे.पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांना ताबडतोप उपचार करूण त्याची चौकशी आणि रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोप क्वरंटाईन करूण वाढणारा धोका थांबवण्याचे काम तालुका प्रशासनाने आगदी खबरदारीने केल्याचे दिसते.या संगळया कामामध्ये तालुका प्रशासनाची महत्वाची भुमीका राहीलेली आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या