पडळकरच्या वक्तव्यावरूण समस्त धनगर समाजाला टार्गेट करू नये — सुरेश कांबळेभूम: मुकुंद लगाडे

गोपिचंद पडळकरच्या वक्तव्यावरूण समस्त धनगर समाजाला टार्गेट करू नये असे धनगर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांनी आज भुम येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर गदारोळ माजलेला आहे,त्याच कारण म्हणजे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेले वक्तव्य.गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य ही त्यांची वयक्तिक भूमिका आहे तसेच त्यांचे वक्तव्य धनगर व मराठा समाजातील युवकांमध्ये जातिय  तेढ निर्माण करुन युवकांना भरकटविण्यासाठी केलेली राजकीय खेळी असू शकते, यामध्ये धनगर समाजाचा काडीमात्र संबंध नाही.परंतु या वक्तव्या नंतर सोशल मीडियावर काही संतापजनक घटना निदर्शनास आल्या,काही महाभाग वयक्तिक पडळकरांवर टीका करण्याऐवजी धनगर समाजावर अर्वाच्य भाषेत बोलताना दिसून आले.अशा सर्वांना मी सांगू इच्छितो की,कोणताही नेता म्हणजे संपूर्ण समाज असू शकत नाही. नेत्यांच्या आडून जर कोणी धनगर समाजाला टार्गेट करत असेल तर त्याला मल्हार आर्मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही व त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.त्याचबरोबर माझी सर्व शरद पवार व गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की हा तुमचा राजकीय वाद आहे,यामध्ये कोणत्याही समाजाला आणून जातीय तेढ निर्माण करून  राज्यातील वातावरण खराब करू नये.आपल्या महापुरुषांनी टिकवून ठेवलेला सामाजिक सलोखा आपल्या वक्तव्याने बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.असे मल्हार आर्मी चे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या