रिपोर्टर: आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटी किंवा अन्य वाहनाने पंढरीला नेण्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने 30 जून रोजी दशमीला मार्गस्थ होणार आहेत.
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदा पायी-पालखी वारीस प्रतिबंध करून आषाढी एकादशीला हॅलिकॉप्टर अथवा बसने संताच्या पादुका पंढरीला नेण्याबाबत प्रशासनाकडून तयारी सुरू होती. अखेर आज एसटी बस अथवा अन्य वाहनाने संतांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेण्यासाठी परवानगी दिली आहे.
इन्सिडेंट कमांडर म्हणून चौघांची नेमणूक करण्यात आली आहे.
पादुका घेऊन जाणा—या बसेस पंढरपुरात रात्री 11 काजेपर्यंत पोहचतील.
प्रवासात दर्शनासाठी कोणत्याही ठिकाणी बस थांबवू नये.
पादुकांसोबत बसमध्ये 20 व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली आहे.
0 टिप्पण्या