मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरून नाही तर जमिनीवर येऊन काम करावे:आ.ठाकूर

 


रिपोर्टर: मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरून नाही तर जमिनीवर येऊन काम करावे आणि जनतेशी संवाद साधावा म्हणजे महाराष्ट्रात कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर मात करता ये​ईल असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटनिस तथा विधानपरिषद सदस्य आमदार ठाकुर यांनी व्यक्त केले.उस्मानाबाद येथे मोदी सरकारच्या 2.0 वर्षीपुर्ती अभियान विषयी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ.ठाकूर बोलत होते.यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपाचे जिलाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अॅड खंडेराव चौरे, सतिष दंडनाईक आदी उपस्थित होते.

राज्य सरकार ने जनतेला एक दमडीची ही मदत केली नाही, मदत न करणारे एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, असे आ. ठाकूर यांनी सांगितले.गेल्या वर्षभरात मोदी सरकार ने जम्मू काश्मिरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करने, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, आयोध्या येथील राममंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन बांधकाम करणे, पाकिस्तान, बागलादेश, आफगाणिस्तान मधील पीडीत धार्मिक अल्पख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी सूधारणा कायदा करणे, त्याच प्रमाणे इतर देशांच्या तुलनेने देशात कोरोनाचा समर्थ पणे मुकाबला करणे, त्यामुळे मोदी सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहे, अशी माहिती आ सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
आमदार ठाकूर यांनी सांगितले की,पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचा समर्थपणे मुकाबला केल्यामुळे देशाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले नाही, भारताची लोकसंख्या आणि कोविड चा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखी आहे. सारखीच लोकसंख्या असून ही १ जून २०२० ला १४ देशामधील एकत्रित लोकसंख्या पैकी कोविड  संसर्ग झालेली संख्या भारताच्या ५२ . ५ पट अधिक आहे. तर मृत्यूची संख्या भारताच्या तुलनेत ५५ . २ पट इतकी आहे. मोदी सरकार ने देशात विविध निर्णय घेत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करणे, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी त्वरीत वैद्यकीय सुविधा निर्माण करणे, रूग्णांवर प्रभावी उपचार करने आदी कारणामुळे देशातील नुकसान कमी झाले. कोरोनामुळे अर्थ व्यवस्था ठप्प झाल्यामुळे  झळ बसलेल्या दुर्लब घटकांना केंद्र सरकार ने तातडीने १ लाख  ७० हजार कोटीचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले. आतापर्यंत ४२ कोटी गरजूंना ५३ हजार २४८ कोटीची मदत देण्यात आली.कोटयावधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करणे, मौफत गॅस सिलेंडर देणे, जनधन खाते, ज्येष्ठ नागरी, विधवा व दिव्यागांना थेट आर्थिक मदत करणे आदी प्रभावपणे मोदी सरकार ने कार्य केले आहे.
 आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्र सरकार ने विविध स्वरूपात जिल्हयाला ३०० कोटी रुपयांची मदत झाली आहे व आत्मनिर्भर योजनेतंर्गत विविध योजना जिल्हयात आणून जिल्हा आत्मनिर्भर करणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या