रिपोर्टर
संपूर्ण राज्यातल्या नाभिक समाजाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. कारण राज्यातील केशकर्तनालय व पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे अशी माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोलीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात चर्चाही झाली आहे असेही ते म्हणाले.
सलून सुरु करण्याच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनही झाली. अखेर नाभिक समाजाच्या मागण्यांची सरकारने दखल घेतली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असून येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र सलून सुरु झाल्यावर सामाजिक अंतर व इतर अटींचे पालन करावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.
वाजंत्री वाजणार
अनलॉकच्या या टप्प्यात आता मंगल कार्यालयात 50 वऱहाडी व पाच वाजंत्री यांच्या उपस्थितीत लग्न लावता येईल. मात्र मंगल कार्यालयातील वातानुपुलीत यंत्रणा बंद ठेवावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंतर जिल्हा वाहतूक
केंद्र सरकारच्या निर्देशानंतर रेड झोन वगळून उर्वरीत भागात आंतर जिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचेही ते म्हणाले.
0 टिप्पण्या