
दरोडेखोरांनी गावातील वेगवेगळ्या चार घरांना लक्ष्य बनविले. यात अण्णा मनोहर डोके, भुसार मालाचे व्यापारी अरुण दगडू मोटे व त्यांच्या पत्नी कालिंदा अरुण मोटे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. अण्णा डोके यांच्यावर बीड येथील ग्रामीण रुग्णालयात तर अरुण मोटे व त्यांची पत्नी यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
याच वेळी पारगावचे माजी सरपंच महादेव आखाडे यांच्याही घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र येथील कुटुंब जागे असल्याने चोरटे पळून गेले. दरम्यान मेहबूब पठाण यांच्या घरात जाऊन दरोडेखोरांनी गल्ला तोडण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान शेजारच्या काही लोकांच्या घराच्या कड्या लावून हा मारहाणीचा प्रकार घडल्याने पूर्णतः गावातील नागरीक भयभीत झाले आहेत.या घडलेल्या घटनेमुळे व्यवसायिकांनी गाव बंद केले आहे.
सविस्त वृत्त काही वेळात ...
0 टिप्पण्या