गावखेड्यातला साधा माणूस ते मुंबई नगरीतील दिग्गज उद्योजक,राजकारणी तरी ही पाय जमीनीवरच

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हातील वाशी तालुक्यातील एक तरुण नोकरी ,रोजगारासाठी मुंबईत जातो आणि काही वर्षामध्ये आपल्या स्वभावाची ,परिश्रमाची ,बुध्दीकौशल्याची छाप पाडत उद्योजक होतो. सुरुवातीला मुंबईत मध्ये नोकरी केली ,थोड स्थिर झाल्यावर ईंजीनिअरिंग उद्योगाला ,कंपनीला लागणारा  कच्चा माल पुरवठा यशस्वीपणे केला.काही वर्षानंतर व्यवसायात नफा झाल्यावर बांधकाम व्यवसायाशी निगडीत स्टील,फरशी उद्योगा मध्ये भरभराट केली ,स्वतःचे युनिट उभारले,बांधकाम व्यवसायात नाव निर्माण करत भारतीय लष्करासाठी असणारे गृहनिर्माण प्रकल्पाचे  मोठे काम हाती घेत शासकीय बिल्डर कंञाटदार झाले.याच दरम्यान वाशी तालुक्यात स्वतःचा साखर कारखाना निर्मिती  करत जनसामान्यासह शेतकर्यांना लाभ मिळवून दिला .
 मुंबईत  1988  च्या सुमारास मराठी उद्योजकांची काही काळ गळचेपी झाली अशा वेळी या मराठमोळ्या धाडसी रांगड्या  तरुणाने मराठी व्यावसायिकासाठी सरकार दरबारी  आवाज उठवत लढा दिला आंदोलन केले. त्याच वेळी हा शंकर बोरकर कोण रे ?  म्हणत खुद्द हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री वर बोलवत शंकरराव (तात्या) बोरकर यांना दिलासा दिला.
त्यावेळी तात्या शिवसैनिक झाले व  त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईतील मराठी उद्योजक ,तसेच गावाकडील उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणासाठी ,समाजासाठी मदत करणे सुरु ठेवले.
तात्या स्वतः अभ्यासू असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक तरुणाना नोकरी दिली तसेच शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकासाठी .त्यांच्या शिक्षणासाठी ,रोजगारासाठी ,कुटूंबासाठी स्वयंपूर्तीने मदत केली .त्यामुळे मुंबई सह उस्मानाबाद येथिल भूम परंडा वाशी मतदारसंघातील जनतेसाठी  शंकरराव (तात्या) बोरकर हे व्यक्तीमत्व आपलेसे वाटू लागले .
 आज शंकरराव (तात्या) बोरकर हे विविध व्यावसायात अग्रस्थानी आहेत तसेच शिवसैनिक म्हणून फार वर्षापासून कार्यरत आहेत .
वंदनिय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांना भावलेला शिवसैनिक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे. शंकरराव (तात्या) बोरकर  सध्या उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत तसेच ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे जवळचे कार्यकर्ते समजले जातात .त्यांच्या सामाजिक ,उद्योजकीय,शैक्षणिक  ,राजकीय कार्याचा आलेख खूप मोठा आहे. यशाची अनेक शिखरे तात्यांनी पादाक्रांत केली असली तरी त्यांचे पाय कायम  जमिनीवरच असतात.तोच साधेपणा, बोलण्यात मराठवाडी भाषेचा गोडवा,कधीही संपर्क केला तर आस्थेवाईकपणे चौकशी करत होकार देण्याची प्रवृत्ती या वैशिष्ट्येपूर्ण स्वभावामुळे तात्या जनमाणसात लोकप्रिय आहेत.
आशा या बहुआयामी ,नेतृत्व संपन्न ,कार्यकुशल ,बुजूर्ग शिवसेना नेत्याचा  आज वाढदिवस आहे. तात्यांच्या  वाढदिवसानिमित्त  लेखाच्या माध्यमातून कार्यकतृत्वांवर थोडक्यात  टाकलेला हा प्रकाशझोत आहे.
कोरोना संकटातून सर्व मानवजातीची लवकर सुटका व्हावी असा संदेश त्यांनी दिला आहे.
शंकरराव (तात्या) बोरकर आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

लेखक  नितीन जाधव.
मंञालय मुख्य संपर्क प्रमुख
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ,मुंबई
मो 9326398001

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या