उस्मानाबाद जिल्हयातील कोरोना रूग्णांचा आकडा 77 वर तर तिघांचा मृत्यू:


रिपोर्टर- उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 76 झाली असुन एकूण बरे झालेले रुग्ण 19 आहेत. तर
उपचार घेत असलेले रुग्ण 54 आहेत.

उस्मानाबाद जिल्हयातील 90 व्यक्तींचे स्वॅब रविवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 75 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले तर २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. व तीन व्यक्तीचा  अहवाल अनिर्णीत आला होता.या पैकी आणखी दहा अहवाल प्रलंबित होते,त्यांचे अहवाल सोमवारी मिळाले असुन दहा पैकी तीन पॉजिटीव्ह आणि सात अनिर्णीत रिपोर्ट आले आहेत. पॉजिटिव्ह रुग्णामध्ये सुंभा ता.उस्मानाबाद येथील एक 23 वर्षाची महिला, दोन जण वाटेफळ ता. परंडा येथील रुग्ण आहेत. एक रुग्ण 40 वर्षाचा तर एक रुग्ण 24  वर्षांचा आहे.आज पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने तिन जनांचा मृत्यू झाला आहे.आज तिसरा मृत्यू शिराढोण ता.कळंब येथील एक 64 वर्षाची महिला काल सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या