२००१ च साल होतं मी दिग्दर्शक, लेखक, आंतरराष्ट्रीय फिल्म प्रशिक्षक व इतरही बरेच काही अशा श्री. अरूण खोपकर यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. आम्ही 'हाथी का अंडा' हिंदी भाषेतील सिनेमा तयार करत होतो. हा चित्रपट बाल चित्र समिती या केंद्र शासन निर्माण संस्थेतर्फे निर्मित सिनेमा होता. यात 'लगान' मधील हिरॉईनचा 'बाप' झालेले श्री वल्लभ व्यास, त्यातीलच लहान मुलाची भूमिका केलेला अमीन गाझी, रेणुका शहाणे, तुषार दळवी, हीबा शाह, लीना भागवत असे कलाकार होते. व चाळीतल्या लहान मुलांच्या भूमिकेत ' श्रेया बुगडे , ( चला हवा येऊ दया फेम ) होती आणि आणखी एका अगदी छोट्या भूमिकेत होते. इरफान खान! सर
त्या काळात इरफान सर यांचे सलाम बॉम्बे, एक डॉक्टर की मौत असे पाच सहा सिनेमा येऊन गेले होते. तसेच एक दोन मालिकांनी त्यांना थोडे नाव मिळवून दिले होते. पण संघर्ष सुरू होता. अजून रिक्षा, लोकलनेच फिरत होते. आमच्या सिनेमात त्यांना महत्त्वाची छोटीशी अशी, चार छोट्या दृष्यांची भूमिका होती. श्री वल्लभ व्यास यांच्या लहान भावाची. जो लफंगा आणि सणकी असतो. ते त्या भूमिकेसाठी अगदी योग्य होते. आणि त्यांचे काम केलं ही छान सुंदर. त्यांच्या विशिष्ट स्टाईल मध्ये.
खोपकर सरांनी त्यांची निवड केली होती. खोपकर सरांची कलाकार किंवा तंत्रज्ञ निवडण्याची पद्धत खूपच भारी होती, खरतर मोठ्या भावाची भूमिकेसाठी नसिरुद्दीन शहा यांची निवड करायची होती आणि लहान भाऊ इरफान खान असं. पण सरांनी नसिरुद्दीन शहा यांच्या कामाच्या पद्धती बद्दल सरफरोशचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मथान यांना फोन लावला कारन ( जॉन सर खोपकर सरांचे F T i i चे विद्यार्थी होते ) अनं आणि त्यांच्याकडून समजलेल्या कामाच्या पद्धती मूळ नसिरुद्दीन शहा यांच्या जागी वल्लभ व्यास यांची निवड झाली त्यांनी सरफरोश मधे पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची भूमिका केली होती. पण इरफान खान यांची निवड पक्की होती, इरफान.खान यांना भेटीसाठी सरांनी माहीमच्या ऑफिस मधे बोलावलं पहिल्या भेटीत खोपकर सरांनी त्यांच्या कामाची पद्दत सांगितली अनं इरफान सर भारावून गेले अनं अभिनयाच्या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तक दिली अनं पुढील कामासाठी ते आमच्या ऑफिसात यायचे. भूमिका समजावून घ्यायला व चर्चा करायला. नंतर चहा पाणी, एकत्र जेवणही व्हायचे. अशा चार, पाच भेटी झाल्या. बर्यापैकी स्थिरावलेले कलाकार असले तरी ते अगदी साधे होते, सहजभावाने मित्रत्वाने वागत. मग चित्रिकरण सुरू होनार होतं. ते गिरगावात ( मुंबई ) होते. माझ्याकडे सगळ्या कलाकारांना डिटेल्स , कॉल टाईम, लोकेशन व इतर जबाबदारी माझ्याकडे होती , कारन त्या फिल्म मधील छोटी मोठी कास्टिंगपन मी केली होती. मी पण नट होतो तरी पण माझ्या भूमिकेची निवड फायनल होतं नव्हती छोटीशी भूमिका हट्टाने शांता गोखले चित्रपट लेखिका असल्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने येकदाची फायनल जाहली अनं मी सहाय्यक अधिक नट अशी जबाबदारी घेतली तेंव्हा ज्या दिवशी माझे सीन असतील तेंव्हा मी नट म्हणून काम कारनार होतो अनं माझ्याकडील काही जबाबदारी सह दिग्दर्शक म्हणून काम करणारे विजय कुलकर्णी (सोलापूर) सुचीत्रा साठे सध्या ( F T I I पासआऊट एडीटर ) व श्रीकांत आगवानें सध्या ( F T I I ) प्रोफेसर व क्षिती जोग सध्या ( अभिनेत्री निर्मात्या ) यांनी वाटून घेतल्यामूळ मी रोल करू शकणार होतो. इरफान सर मला ऑफिस मधे म्हणालें खोपकर सर नें आपसे बाकी की चीजोकें कें बारेमे बात कर्णेकौ कहा है , सरांना मी डेट लोकेशन ऍड्रस मॅप दिलं , आणि कॉल टाईम सकाळच्या 9 च्या शिप्ट ला 8:30 चा दिला, अनं म्हणालों सर एक मिनिट भी लेट नहिं चलेगा, तेंव्हा इरफान सर म्हणले सोमनाथ में अंधेरी में रहता हू तो मुझे कैसे आना होगा , ट्रेन में तो बहोत भीड होगी , चर्चगेट की तरफ , चढणा मुश्किल होगा , आप बताओ मै कैसे आऊ , ते मला टिपिकल असिस्टंट ला बोलतात तसं बोलले , तेंव्हा मी म्हणालो सर मै भले असिस्टंट हू पर मै भी ऍक्टर हू , ते जरा अवाक झाले अनं मला म्हणले तो हम येक ही बिरादरी के निकले ! मी म्हणालों जी सर ! तो आप तय करो मुझे कैसे आना जाना होगा , मी म्हणालो सर आप कार बुक करके आओ, कार का किराया प्रॉडक्शन मॅनेजर देंगे , अनं त्यांनी मी घेतलेला हा निर्णय त्यांना आवडला अनं ते खुश झाले अनं मला घट्ट मिठी मारली , ये हुई ना बात म्हणतं , हातात हात मिळवला , अनं मला अजून स्पूरन चढले अनं मी त्यांना सांगितल सर आप को जो चाहिये ओ मिलेगा ओ मै देख लूण्गा , लेकिन लेट नहिं आनेका ! तेंव्हा नुकतेच मोबाईल आले होते , मला खास मोबाईल फोन दिला होता खोपकर सरांनी सीमेण्स कंपनीचा , एक दिवस 8:31 जाहले अनं मी इरफान सरांना फोन केला , सर आप कहा है ? त्यांनी सोमनाथ भाई आपके पीछे म्हणतं , माझ्या खांद्यावर हात टाकला , अनं म्हणले अरे भाई तुम तो काटाभी हिलनें नहिं देते , मी म्हणालों सर , मुझे आपसे ही तो सिखना है ! एका दिवशी माझे सीन होते , त्या दिवशी मी सेटवर कलाकार म्हणून वावरत होतो , मेकप , कपडे , सगळं काही टापटीप मधे होऊन मी इरफान सरांना मेकअप रूम मधे भेटायला गेलो अनं सांगितल सर आज मेरा सीन है , एक बहुत छोटासा कॅरॅक्टर कर रहा हू ! अरे वा ! सोमनाथ कॅरॅक्टर छोटा मोठा नहिं होता, डरो मतं मजालेंके करो , आप भी बढ़िया ऍक्टर बनोगे , असं म्हणालें अनं माझ्या डोळ्यात पाणी आलं ! अनं मी डोळे पुसत सेटवर गेलो !
या सिनेमात आणखी एक 'सरप्राईज नट' होते... तौफिक कुरेशी! सिनेमाचा हीरो जो लहान मुलगा होता तो 'परझान दस्तूर' - कुछ कुछ होता है फेम 'सरदार' मुलगा. तर हा मुलगा एका खेडेगावात आपल्या मामाकडे जातो. तो मामा म्हणजे तौफिकजी. ते या सिनेमाचे संगीत दिग्दर्शकही होते. आणि सिनेमातही ते तालवाद्य कलाकार होते.
तर असा तो सिनेमा व्यवस्थित तयार झाला. निर्मात्यांना सुपूर्द झाला
त्यानंतर सिनेमाच्या ट्रायल खेळाला आमची भेट झाली ती शेवटची. नंतर जो तो आपल्या वाटेने गेलें. २००३ला हाथी का अंडा या चित्रपटाला चिल्ड्रेन बेस्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला अनं इरफान भाई त्यांचा चरस , हाशील मूक्बूल सिनेमा आला...आणि पुढे त्यांनी गरूडपंख पसरून झेप घेतली, ती संस्मरणीय! काळावर त्यांनी आपली छाप उमटवली, ती पुसली जाणार नाही.
अल्पकाळ भेटलेला नट आपल्या सर्वांचे डोळे ओले करून फारच अकाली निघून गेला. पण मागे एक चमचमती लकेर सोडून. तीचे तेज कायमचे जवळ राहील.
0 टिप्पण्या