वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार : वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली


बोरगाव मंजू:रिपोर्टर 
आज देशभरात कोरोना चा  प्रादुर्भाव असल्यामुळे संपूर्ण देश लाकडाऊन आहे  तसेच या माहामारीपासून जनतेचा बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी वेगवेगळे आदेश परिपत्रकाद्वारे काळत आहे . सर्व जनता या माहामारी  मुळे , लाकडाऊन मुळे अत्यंत परेशानी आहे. अश्या परिस्थिती लॉक डाऊन दरम्यान काही लोक गरज नसताना सुद्धा विनाकारण रोडवर मोटरसायकलने फेरफटका मारणे करिता निघत आहे अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळे नियम काढण्यात आले आहे. याच परिस्थितीत अतिआवश्यक सेवेसाठी मात्र लोकांना शासनाने दिलेल्या वेळेमध्ये आवश्यक कामांसाठी घराबाहेर निघण्याची मुभा दिली आहे तसेच विनाकारण फिरणार यांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या परिस्थितीत अकोला पोलीस यांच्याकडून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांना जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अकोला यांनी दिले आहे मात्र बोरगाव मंजू येथील वाहतूक पोलीस कर्मचारी कैलास गवई हे आपले मनमानी कारभार करत असल्याची चर्चा संपूर्ण गावभरात सुरू आहे .ज्या आवश्यक कामांसाठी प्रशासासनाकडून मूभा दिली आहे. त्या वेळेत सूध्दा हे जमदार साहेब आपली जमदारकी दाखवत आहे दवाखाने मेडिकल अश्या अत्यावश्यक कामांसाठी सूद्धा कोनी वाहन घेऊन आले तर त्याचे काहीही म्हनने न ऐकून घेता  त्याचे वाहन जप्त करतात.व  वरीष्ठानी आकारलेल्या दंडाच्या रकमे पेक्षा दूप्पट रक्कम वसूल करत आहेत. तसेच अनेक गावांतील प्रतीष्ठीत नागरीक , माजी सैनीक किंवा अनेक शासकीय कर्मचारी यांना उद्धटपणाची वागणूक देतात. या आधी सूद्धा त्यांच्या अनेक तोंडी तक्रारी ठानेदार साहेबा पर्यत केल्या असून सूद्धा या तक्रारींवर वरीष्ठांकडून दूर्लक्ष होत असल्याचे अनेकांचे म्हनने आहे. या कोरोना आणी लाकडाऊन मूळे आधीच देशाची च नव्हे तर सर्व जनतेची आर्थीक परीस्तीती अत्यंत बिकट झाली आहे या परीस्तीतीत लोकांना पोट भरन्याची सूद्धा अनेकांची क्षमता राहीली नाही अश्या परिस्थिती मध्ये हे जमादार साहेब अव्वाच्यासौव्वा दंड आकारून गरीबांची कंबर मोळी करत आहे. तरी या सर्व परीस्थिती त वरीष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन वाहतूक पोलीस गवई यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

संजय गवई,प्रतिक्रीया : 

मि माजी सैनीक असून आज रोजी रेल्वे विभागात कर्मचारी असून चांदूररेल्वे येथे कार्यरत असून मि डिवटीवर जात असतांना वाहतूक पोलीस कर्मचारी कैलास गवई यांनी त्व मला अडवून "लाकडाऊन दरम्यान रिकामा का फिरतो चल गाडी ठान्यात लाव " त्या वेळी मि त्यांना खूप समजवन्याचा प्रयत्न केला पन माझे कूठलेही म्हनने ऐकून न घेता माझ्यासोबत उद्धट पानांची वागनूक करून मला अपमानीत केले .अशी ऊद्धट  वागणूक करणार्या कर्मचार्यांवर तात्काळ कार्यवाही व्हावी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या