टी,व्ही दुरूस्ती करणारे वाघ यांच्याकडून गावातील गरीब कुटूंबांना किट चे वाटप


रिपोर्टर: दौलत असून उपयोग नाही दानत पाहीजे ही जुनी म्हण आज कोरोनाच्या संकटामध्ये ब—याच ठिकानी आनुभवायला मिळाली. टि,व्ही,दुरूस्त करणा—या बावी गावातील पिंटू वाघ यांनी कोरोनामुळे संकटात आणा—या गावातील गरीब कुटूंबांना ​जीवनावश्यक किट चे वाटप केले.वाघ यांचे गावामध्ये इलेक्ट्रॅनिकचे छोटे दुकान असुन त्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

जगभरात कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारी मुळे आणि लॉक डाऊन च्या आलेल्या संकटामुळे गाव खेड्यातील सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आसताना ग्रामीण भागात ग्रामस्ताना आनेक आडचनीचा सामना करवा लागत आहे.परंतू आशा संकटाच्या काळात काही सर्वसामान्य लोक सुध्दा धावून येतात.वाशी तालुक्यातील बावी येथील पिंटू वाघ हे त्याचेच एक उदाहरण आहे. वाघ यांचे गावामध्ये टिव्ही दुरूस्तीचे दुकान आहे.आपल्या छोटयाशा व्यवसायातुन आलेल्या पैशाने गरीब कुटूंबांना मदत म्हणून वाघ यांनी लॉकडाउन मध्ये आडचनीत असलेल्या गावातील ग​रीब कुटूंबांना किराणा मालाच्या किट चे वाटप केले.वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये प्रति कि दोन किलो प्रमाणे साखर,शेंगदाणे,तेल साबण,निरमा या सारख्या जीवनावश्यक वस्तूंचा सामावेश आहे.आपल्या छोटयाशा व्यावसायातून पिंटू वाघ यांनी केलेले काम पहाता.दौलत असून उपयोग नाही दानत पाहीजे असेच म्हणावे लागेल.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या