सोनारी येथे सचिन सोनारीकर यांची घरपोच इफ्तार पार्टी

रिपोर्टर

            दि. 4 मे रोजी सोनारी ता. परांडा येथील समाजसेवक, प्राणीमित्र श्री सचिन सोनारीकर यांनी इफ्तार पार्टी चे आयोजन केले होते. गावातील 75  मुस्लिम बांधवांना घरपोच खाद्यपदार्थ देण्यात आले..
            तसेच सामाजिक भान ठेऊन सचिन हे गेल्या 4-5 वर्षांपासून 2-3 हजार माकडांचे पालन पोषण करत आहेत
             पवित्र रमजान महिन्यात सचिन सोनारीकर यांनी भाईचारा जपत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी चे अयोजन करण्यात आले..
              सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या परिस्थितीमध्ये सोशल डिस्टेंसिंग चे पालन करत, हा कार्यक्रम पार पडला. सोनारी गावातील तब्बल 75 मुस्लिम बांधवाना केळी, खजूर आणि बिर्याणी इ. चे जेवण घरोघरी जाऊन देण्यात आले....
               यावेळी मतीन तांबोळी,असिफ तांबोळी,निलेश इटकर, महेश मिटकरी,दत्ता हांगे,पिंटू मांडवे, दादा जाधव, ब्रह्मदेव वडेकर, वसिम तांबोळी आदि उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या