स्वस्त धान्याचे पारदर्शक वाटप होण्यासाठी इंगोले यांचे आंदोलन


 


 रिपोर्टर: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडुन स्वस्त धान्य दुानाच्या माध्यमातुन मोफत देण्यात येणा—या धान्य वाटपात पारदर्शकता आनण्यासाठी वाशी तालुक्याचे भाजपाध्यक्ष सचिन इंगोले यांनी दि 1मे रोजी वाशी येथे रस्तारोखो आंदोलन केले.मात्र कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या संचार बंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या काळात शहरी भागासह ग्रामीण भागात ही कोणी उपाशी राहु नये म्हणून सरकारने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातुन अंतोदय आणि प्राधान्य गटातील रेशनकार्ड धारकांना नियमीत धान्यापेक्षा प्रतेकी पाच किलो तांदुळ मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाउनच्या काळामध्ये पॉस मशिनवर आंगटयाचा ठसा घेण्यासा बंदी असल्याने राशिन दुकानदार यामध्ये आपले उकळ पांढरे करूण घेत आहेत.ही बाब निदर्शनास आल्यावर वाशी तालुक्याचे भाजपाध्यक्ष सचिन इंगोले यांनी या बाबत वाशी तहसिल दार यांना निवेदन ही दिले हाते.मात्र त्याची दखल न घेता राशिन दुकानदारांचा मनमानी कारभार चालुच असल्याने महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधुन धान्य वाटपामध्ये पारदर्शकता यावी म्हणून रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले त्यावेळी वाशी पोलीसांत इंगोले यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या