बाहेरूण शहरात येणाराला केले जाईल इंस्टीट्यूश्नल क्वारंटाईन:नगराध्यक्ष


रिपोर्टर: कोरोनाचा वाढता प्रभाव असताना ही उस्मानाबाद शहरात एकही कोरोना रूग्ण आढळून आला नव्हता.परंतू मागील काही दिवसात बाहेरूण आलेल्या नागरिकांमुळे शहरातील रूग्णाचा आकडा वाढत असुन त्याला प्रतिबंध म्हणून नगरपालीकेच्या वतीने विविध उपाय केले जात आहेत.शहरामध्ये बाहेरूण येणा—या प्रतेक नागरिकाला पालिकेच्या तीन  शाळांमध्ये इंस्टीट्यूश्नल क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

 कोरेानाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत उस्मानाबाद नगर पालिकेने 800 लोकांना होम क्वारंटाईन केले असुन मागील दोन महिन्यात आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये एकही कोरोना बाधीत रूग्ण सापडलेला नव्हता परंतु मागील आठ दिवसांमध्ये 9 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत व हे सर्व  रूग्ण  बाहेर गावाहून आलेले आहेत.बाहेरूण अलेल्यामुळेच उस्मानाबाद शहरात कोरोना चा प्रसार होत असल्याचे  दिसत आहे म्हणून बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना नगर पालिकेच्या वतीने होम क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु काही नागरिक प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करता बाहेर फिरताना दिसत आहेत. कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव शहरामध्ये वाढू नये यासाठी  यापुढे बाहेर गावाहून येणा-या प्रत्येक नागरिकाला नगर पालिकेच्या वतीने इंस्टीट्यूश्नल क्वारंटाईन करण्यात येणार आहे .शहरातील नगर पालिकेच्या तीन ते चार शाळांमध्ये इंस्टीट्यूश्नल क्वारंटाईन ची व्यवस्था करण्यात येणार असुन येथे असलेल्या नागरिकांना जेवनाची व इतर गरजू वस्तुंची सोय नगर परिषद उस्मानाबाद च्या वतिने करण्यात येणार आहे. जेणेकरुन बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांमुळे होणारा धोका टाळण्यासाठी मदत होईल. यापुढील काळात ही कोरोना व्हायरस च्या विषाणू चा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशाच प्रकारचे लोकोपयोगी निर्णय उस्मानाबाद नगर परिषद च्या वतीने घेण्यात येणार आहे . तरी नागरिकांनी योग्य त्या  सुचनांचे पालन करावे व सुरक्षित रहावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवहान नगराध्यक्ष मकरंद राजेनिबांळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या