लॉकडाउन आणि उष्णतेच्या काळात महावितरण ने लाज का सोडली?

रिपोर्टर: उष्णतेची तिव्रता वाढत असताना आणि लॉकडाउनमध्ये संगळे लोक घरात बंद असताना पाच पाच मिनिटाला शहरातील विज बंद करण्याचे काम महावितरण कडून होत आहे.आनेक वर्षापासुन महावितरण चे चालत आलेले  हे चाळे जनता लॉकडाउनच्या संकटात असताना सुध्दा थांबायला तयार नाहीत.विजेच्या लपनडावामुळे वैतागलेले नागरीक लॉकडाउन आणि उष्णतेच्या काळात महावितरण ने लाज का सोडली? आसा सवाल विचारत आहेत.

कारोनाच्या पार्श्वभुमीवर संगळी जनता एका ठिकानी बसुन असताना आणि उन्हाळयाचा तिव्र उष्णतेचा मे महीना सुरू असताना शहरातील विज तांसनतस बंद राहत आहे.या महावितरणच्या पराक्रमामुळे लहान लेकरासह अबाल वृध्दाचे उकाडयाने हाल होत आहेत.याची थेाडी ही पर्वा न करता एमएसिबीने आपली लाजीरवानी परंपरा कायम ठेवली आहे.ग्राहकाकडुन विज बिल एक दोन दिवस थकीत झाल्यावर कनेक्शन तोडण्यासाठी येणारे महावितरणचे अधिकारी आसल्या परिस्थितीमध्ये काय झोपा काढतात ​का?हा मोठा प्रश्न आहे.आठ दिवसातुन एखादया दिवशी विज बंद असेल तर कोणाची काही तक्रार देखील नसते मात्र पाउस,वारा नसताना वेळोवेळी विज बंद करणे हे महावितरणचा शाहानपणा आहे की अज्ञानपणा?  महावितरणकडे चांगले तज्ञ कामगार नसतील तर त्यांनी हुशार आणि अनुभवी लोकांची भरती करूण  परंपरेच्या चुका दुरूस्त कराव्यात आणि लोकांचे होत असलेले हाल थांबवावेत.आशी मागणी शहरवाशियांकडून करण्यात येत आहे.
वीजदरात सरासरी 7% टक्के कपात केल्याचा दावा उर्जा मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे.फेब्रुवारी 20 20 चा इंधन समायोजन आकार 1.05  रुपये प्रतियुनिट मूळ सरासरी देयक दारात समाविष्ट केला आहे .त्यामुळे 2019 20 च्या सरासरी देयक दर 6.85 रुपये प्रतियुनिट ऐवजी 7. 90 रुपये प्रति युनिट गृहीत धरलेला आहे व हा देयक दर 7. 90 वरून 7. 31 रुपये प्रति युनिट वर आणला म्हणजे दर कपात केली असे दाखविले गेले आहे .प्रत्यक्षात सरासरी देयक दर 6. 85 रुपये प्रतियुनिट वरून 7. 31 प्रति युनिट याप्रमाणे वाढविण्यात आला आहे. ही दरवाढ 0. 46 रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी 6.7 टक्के होते.आशा प्रकारे विज पुरवठा सुरळीत नसताना सुध्दा विजदर कमी करण्याचे दावे करूण ग्राहाकांची फसवनूक करण्याचे काम महावितरण कडून होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या