रिपोर्टर: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नगरपालिकेचे प्रतेक काम हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असुन ते वेळेत पार पाडणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. या कामात कोण जानून बुजून दर्लक्ष करत असेल किंवा गैरहाजर राहुन आपला मोबाईल बंद ठेवत असेल तर त्या पालिका कर्मचा—यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वे कार्यवाही केली जाईल आशी माहीती नगर पालिकेचे अध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
कारोना आपत्तीच्या काळात उस्मानाबाद नगरपालिका तटस्तपणे आपली भुमीका बजावत आहे.मात्र कोरोनाच्या भितीपोटी काही कर्मचारी गैरहाजर राहुन आपला फोन बंद ठेवण्याचे काम करत आहेत.त्यामुळे नगरपालिकेच्या रोजच्या कामात आडथळे येतात.त्यामुळे नगराध्यक्ष यांच्या कडून सर्व पालिका कर्मचा—यांना असे वर्तन टाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.सुचना मिळताच दोन तासाच्या आत मुख्यालयात हाजर राहावे तसेच 24 तास आपले मोबाईल सुरू ठेवावेत.आणि पालिकेने घालुन दिलेल्या आटी व नियमाचे वेळोवेळी पालन करावे आन्यता आपत्ती व्यवस्थापन आणि शिस्त,आपिल,वर्तनुक या कायदान्वे कार्यवाही करण्यात येणार आहे. आशी माहीती नगराध्यक्ष मकरंद राजेंनिबाळकर यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या