मुरूम मध्ये बाहेरूण आलेल्या महीलांना घरी क्वरंटाईन केल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता.

रिपोर्टर: पुणे,मुंबई सारख्या शहरातून गावाकडे आलेल्या महिलांना क्वरंटाईन सेंटरमध्ये न ठेवता आप आपल्या घरी क्वरंटाईन केल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत असे सांगून मुरूम शहरात मोठया संख्येने बाहेरूण आलेल्या महिलांना आप आपल्या घरी तर पुरूषांना सेंटरमध्ये क्वरंटाईन करण्यात आले आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुणे,मु्ंबई आशा मोठया शहरातुन उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण भागात आपल्या गावी येणा—यांचा आकडा फार मोठा आहे.या लोकांना नियमानुसार चौदा दिवस गावाच्या बाहेर आलगिकरण कक्षात ठेवने बंधन कारक आहे.मात्र तसे न होता  उमरागा तालुक्यातील मुरूम शहरात 200 ते 250 लोक बाहेर गावांवरून आलेले आहेत.त्यामधील पुरूषांना क्वरंटाईन कक्षात ठेवण्यात आले असुन महीला आणि 65 वर्षा पुढील नागरिकांना आप,आपल्या घरी ठेवण्यात आले आहे.या संदर्भांत मुरूम शहरातील आरोग्य आणि नगरपरिषद प्रशासनास विचारणा केली असता.जिल्हाधिकारी यांचे ओदश असल्याचे सांगण्यात आले.गेल्या आठ दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील कोरोना ग्रस्तांचा वाढता आकडा हा चिंतेची बाब असुन आशा परिस्थितीमध्ये बाहेरूण आलेल्या लोकांना क्वरंटाईन करण्याची ही पध्दत माहगात पडू शकते हे मात्र नक्की आहे.कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महिलांसाठी सुध्दा क्वरंटाईन सेंटर उभारणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या