उस्मानाबाद शहर बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश


रिपोर्टर: जिल्हयात आज नव्याने 6 रूग्न पॉझिटिव्ह सापडल्याने शासकीय यंत्रना सतर्क झाली असुन 6 पैकी उस्मानाबाद शहरातील एकजन असल्याने आज आकराच्या सुमारास शहर बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.मागील काही दिवसापासुन नियमीत सकाळ पासुन दुपारी दोन पर्यंत सुरू असलले शहरातील मार्केट आज आकरा वाजता बंद करण्यात आले.

ग्रिन झोन मध्ये आसलेला उस्मानाबाद जिल्हा कोरोना ग्रस्ताना ची संख्या वाढल्याने रेड मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. डिचार्ज झालेली तीन  रूग्ण धरून जिल्हयातील रूग्णांची संख्या 16 वर पोहचली आहे तर आज 13 रूग्ण उपचार घेत आहेत.रूगणांचा वाढता आलेख पाहाता शासकीय यंत्रना सतर्क झाली असुन जनतेला वेळोवेळो काळजी घेण्याचे आवहान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून उस्मानाबाद शहर बंद करण्यात आले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या