मिठ कंपनीची मानसाच्या आरोग्याशी बेइमानी:पॉकींगमध्ये अमाप खडे:

रिपोर्टर:लॉकडाउनच्या काळात किराणा दुकानदारांसह मिठ तयार करणा—या कंपनी ने सुध्दा ग्राहकांशी बेइमानी करत बेशरमीची हाद पार केली आहे.संध्या किराणा दुकानदार लॉकडाउनच्या नावाखाली ग्राहकांची लुट करत असतानाच संगळीकडे उपलब्ध असलेल्या नारी शुध्द या कंपनीच्या मिठ पॉकींग मध्ये मोठया प्रमाणात खडे आढळत असल्याने जेवन करताना काही जानांच्या दातांना इजा सुध्दा झाल्याचे निदर्शनास आले आहे.गृाहकाच्या आरोग्याशी खेळणा—या कंपण्यावर प्रशासनाकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात दळणवळण व्यवस्था आडचीत आल्यामुळे किराणा दुकानात जो माल असेल तसा लोकांनी खरेदी केला आहे.परंतु काही किराणा दुकानदारांनी लॉकडाउनच्या काळात सुध्दा जनतेची लुट केली आहे.जास्तीचे पैसे घेवून खराब मालीची विक्री करूण पैसे कमवण्याचे काम दुकाण दारांनी केले आहे.त्यामध्ये नारी शुध्द या मिठ कंपनी ने तर मिठामध्ये वजन वाढवण्यासाठी पांढरे खडे मिक्स कले आहेत.या खडयामुळे घरामध्ये चवदार बनवलेल्या जेवणामध्ये माती कालवण्याचे काम या नारी शुध्द मिठाच्या कंपनी ने केले आहे.एकीकडे लोकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी संगळा देश बंद आहे.तर दुसरीकडे दलाली वृत्ती असलेली किराणा दुकानदार आणि नारी शुध्द मिठ कंपणी लोकांच्या आरोग्याशी केळताना दिसत आहे.जनतेने नारी शुध्द कंपनी चे मिठ खरेदी करताना विचार करावा आणि प्रशासनाकडुन आशा बंडलबाज कंपणीवर कार्यवाही व्हावी आशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या