पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीसांची परीक्षा:तामलवाडी चेकपोस्ट वर पाठवला डमी प्रवाशी रिपोर्टर: लॉकडाऊन काळात जिल्हाभर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांची सतर्कता व प्रामाणिकपणा तपासण्याच्या हेतूने दि. 17.05.2020 रोजी तामलवाडी चेकपोस्ट येथे एक डमी प्रवासी असलेले वाहन पाठवीले. या वाहनातील डमी प्रवाशांनी चेकपोस्टवरील पोलीस कर्मचारी व त्यांच्या मदतीस असलेले मंदीर सुरक्षा रक्षक यांना प्रलोभण दाखवून, आर्जव- गयावया, विनंती करुन सोलापूर कडे वाहनासह जाउ देण्याचा आग्रह धरला. परंतु यावेळी कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल- सचिन वारे, योगेश कांबळे व त्यांच्या सोबत असलेले मंदीर सुरक्षा रक्षक- गणेश तांबे, महेश गीरी, शेखर ओहोळ यांनी प्रलोभण, विनंतीस बळी न पडता कर्तव्यदक्ष, प्रामाणिक राहुन त्यांना चेकपोस्ट ओलांडून सोलापूर कडे जाण्यास मज्जाव केला. वरील नमुद चेकपोस्ट कर्मचाऱ्यांची कर्तव्य दक्षता व प्रामाणिकपणा पाहुन मा. पोलीस अधीक्षक यांनी नमुद दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 500/- रु. बक्षीस व नमुद तीन्ही मंदीर सुरक्षा रक्षकांना प्रशंसापत्रे दिली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या